बडगुजर समाजाचे केंद्राच्या इतर मागास वर्गात समावेश बाबत :- केंद्राच्या इतरही मागासवर्गीय प्रवर्गात समावेश होण्या करिता गेल्या 8 ते 10 महिन्याचा पासून ” अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व त्या अंतर्गत ओबीसीसमितीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत ” त्याचाच एक भाग म्हणुन राज्य मागास वर्ग आयोग पुणे येथील कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी मा.श्री. नरेंद्र जोशी साहेब यांची अनौपचारिक भेट घेण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय इतरही मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा.श्री. हंसराज अहिर यांनी सचिवालयात सचिवांची तातडीची बैठक घेवून त्यांना नव्याने अहवाल 7 दिवसाच्या आत पाठविण्यासाठी आदेश दिले होते व सदर हालचालींचा वेग येईल असे वाटले होते परंतु आपल्याला समाजाची व इतरही जातींचे अहवाल प्रशासकीय प्रक्रियेत च पडून आहेत कारण आता आचार संहिता लगल्या मुळे त्याबाबतीत काही हालचाल होईल असे वाटत नाही. त्यामुळे आता निवडणुका आटोपल्यावर याबाबतीत हालचाल होईल असे वाटते.यावेळी अखिल भारतीय बडगुजर समाज महा समितीचे अध्यक्ष श्री सुरेश महाले, जळगाव येथील जेष्ठ मार्ग दर्शक श्री. भिला गुरुजी, बीजेपी जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. ललित बडगुजर ,ओबीसी समिती चे उपाध्यक्ष श्री.रविंद्र बडगुजर , जळगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री. राजेंद्र पवार, महासमितीचे सदस्य श्री.लिलाधर बडगुजर हे उपस्थित होते.


Leave a Reply