फागणे येथील सौ. मानसी बडगुजर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या धुळे जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्षापदी निवड

धुळे :- सामाजिक कार्य, विविध उपक्रम व महिला संघटन असे कार्य असणाऱ्या फागणे जि. धुळे येथील सौ. मानसी अमित बडगुजर यांची नुकतीच “राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या धुळे जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्षापदी निवड करण्यात आली.

ना.अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेशाध्यक्ष मा.सुनीलजी तटकरे साहेब आणि महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. पुजाताई खडसे व कार्याध्यक्षा सौ. सरोजताई पवार यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड झाल्या बद्दल त्यांचे चोपडा साळूंखे परिवार, फागणे पढियार परिवारातर्फे व बडगुजर. इन तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व.पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*