वचनपूर्ती
पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगाव येथे चामुंडा माता मंदिर प्रांगणात
मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव यांच्या आमदार निधीतून भव्य असे बंदिस्त सामजिक सभागृह बांधून दिले.सदर बांधकामासाठी भाऊंनी 10 लक्ष रुपये मंजूर केले होते सदर बांधकाम श्री.दिपक पाटील (डी.जी. कन्ट्रक्शन) यांनी पूर्ण केले भाऊंनी चामुंडा माता ट्रस्ट ला शब्द दिला होता की कुलस्वामिनी श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठापना च्या आधी सभागृह तयार होईल आणि ते पूर्ण झाले .गेल्या 10 नोव्हेंबरला कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेची प्राणप्रतिष्ठापना झाली त्या दिवशी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मा. निलेश पाटील साहेब यांच्या हस्ते सदर सामाजिक सभागृहाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी पिंप्री मा.जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सभापती ,शिवसेना तालुका प्रमुख गावचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी चे चेअरमन व्हा.चेअरमन ,सदस्य चामुंडा ट्रस्ट चे पदाधिकारी ,मार्गदर्शक ,बडगुजर सजतील पदाधिकारी प्राणप्रतिष्ठापणीसाठी आलेले महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश राज्यातील भाविक उपस्थित होते. पिंप्री खुर्द बडगुजर बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द यांनी मा.गुलाबराव पाटील स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री जळगाव यांचे आभार मानले आहे अशी सहकार्य पुढे सुद्धा लाभेल अशी आशा व्यक्त केली आहे,
Leave a Reply