कुसुंबा ता. जि. धुळे येथील एम. के. शिंदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप मुख्याध्यापकपदी बडगुजर समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते व अखिल भारतीय बडगुजर महासमितीचे माजी महासचिव श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर सर यांची अभिनंदनीय निवड झाली आहे. याच संस्थेत ते तब्बल 26 वर्षापासून शिक्षक म्हणून उत्कृष्ट असे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी अध्यापन कार्याबरोबर प्रशासकीय कार्यात मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या कामातील शिस्त, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणेसाठीची धडपड व प्रभावी प्रशासन राबविणे या सर्व बाबींचा विचार करून त्यांना संस्थेने उपमुख्याध्यापक पदावर बढती दिली आहे .त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदन वर्षाव होत आहे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वामुळे उच्च पदापर्यंत पोहोचतो. याचा समाजाला अभिमान आहे. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यात आघाडीवर असलेले श्री राजेंद्र बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


Leave a Reply