बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2022-23 प्रक्षेपण

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ – ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, नवी मुंबई व कोकण परिसर आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2022-23 हा प्रोग्राम रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी उल्हासनगर येथे पार पडला. 

सदर कार्यक्रमात बडगुजर समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी तसेच पदवी व पदव्युत्तर स्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. 


सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष सदाशिव पवार, ज्येष्ठ समाजसेवक, कल्याण हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्री गजानन पंडितराव भेरडे, ऐरोली; श्री अशोक बाबुलाल चव्हाण (उद्योजक) ठाणे, श्री मोहन हिरालाल बडगुजर, (जेष्ठ समाजसेवक ) डोंबिवली हे होते. सदर कार्यक्रम महाराष्ट्र मित्र मंडळ हायस्कूल, उल्हासनगर -१ येथे झाला. 

कार्यक्रमासाठी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळचे – श्री बापू किसन बडगुजर, अध्यक्ष; श्री ज्ञानेश्वर देविदास मोरडिया, सचिव व श्री.श्रीराम विश्वनाथ बडगुजर बदलापूर, खजिनदार, श्री धनंजय विक्रम बडगुजर बदलापूर तसेच बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ चे कार्यकारणी ने मेहनत घेतली. 

सदर कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग चिरंजीव रोहित महेंद्र बडगुजर, (अभिनेते) पानसमेल, ह. मु. मुंबई  यांनी केले. सदर कार्यक्रमाची संपूर्ण प्रक्षेपण तुम्ही खाली दिलेल्या युट्युब लिंक वर पाहू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*