आज १४ ऑगस्ट: नागपूर विद्यापीठाने वीर सावरकर यांना ८० वर्षापूर्वी सन्माननीय “डी.लीट.” पहिली मानाची पदवी दिली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव घेताच आठवते ती अंदमानातील काळ्यापाण्याची कठोर शिक्षा,अकल्पनीय श्रम आणि प्रखर बुद्धिमत्ता!
काळ्यापाण्याची शिक्षा पूर्ण सोसून,सुटका झाल्या नंतर तात्याराव पुन्हा भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात रुजू झाले.स्वतःला या समरात झोकून देत त्यांनी, भारतभर प्रवास केला आणि जनमानसात स्वतंत्रतेचे स्फुलिंग चेतविले.पण,या सगळ्यात ध्यास एकच आणि तो म्हणजे स्वतंत्र भारतवर्ष
जाहीर सभा,वेगवेगळ्या संस्थांना भेटीच्या निमित्ताने तात्यारावांचे नागपुरातही अनेकदा येणे होते.शिवाय,हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अन्य ठिकाणच्या प्रवासादरम्यानही नागपूरच्या कार्यकर्त्यांकडे मुक्काम असे. तात्यारावांनी २८ मे १९४३ रोजी वयाची साठी गाठली.
या वयातही तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने ते कार्य करीत होते.त्यांच्या विचारांनी प्रेरित कार्यकर्ते आणि चाहत्यांनी राज्यभरात या दिगंत नेतृत्त्वाच्या एकसष्ठीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित केले,त्यात नागपूरकर मागे कसे राहणार?
वीर सावरकर अमरावतीत १ ऑगस्ट १९४३ रोजी बाबाराव खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सावरकरांचा हीरक महोत्सव थाटाने साजरा करण्यात आला.नागपुरातही २ व ३ ऑगस्ट रोजी थोर समाजसेवक डॉ.मुंजे आणि डॉ.वरदराजलू नायडू यांच्या उपस्थितीत सावरकरांच्या वाढदिवस समारंभाचे जंगी आयोजन करण्यात आले,हीच ती वेळ होती,जेव्हा नागपूर विद्यापीठाने सावरकरांना एक पदवी देऊन गौरविण्याचा निर्णय घेतला,त्यांची अतुल्य साहित्यसेवा लक्षात घेऊन,विद्यापीठाने सावरकरांना ‘डी.लिट.’ही मानाची पदवी १४ ऑगस्ट १९४२ रोजी [८० वर्षापूर्वी]मानाची पदवी अर्पण केली. तत्कालीन कुलगुरू टी.जे.केदार यांच्या प्रेरणेतून स्वातंत्र्यवीरांना ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
सुप्रसिद्ध साहित्यिक धनंजय कीर लिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या पुस्तकात या ऐतिहासिक घटनेचा स्पष्ट उल्लेख असल्याची माहिती सावरकर विचारक आणि लेखक वीरेंद्र देशपांडे देतात.नागपूर विद्यापीठाच्या काही विशेषांकातदेखील याचा उल्लेख आहे.यंदा स्वातंत्र्यवीरांच्या ‘डॉक्टरेट’ला तब्बल ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत.सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेला नमन करणारी पहिली डॉक्टरेट नागपूर विद्यापीठाने त्यांना द्यावी,ही नागपूरकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.
स्त्रोत:गूगल/इंटरनेट.
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे, धुळे.
⛳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⛳


Leave a Reply