आज २६ जुलै:कारगिल युध्दात विजय दिन निमित्तांने🇮🇳तिरंगा🇮🇳 फडकला.!
२६ जुलै १९९९ रोजी,कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. आपण याला भारतीय सैन्यासाठी शौर्याचा हा दिवस म्हणू या.!
कारगिल👇विजयदिन माहिती
👉 भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिलचे युद्ध 1999 मध्ये झाले होते.
👉 या युद्धाची सुरुवात 8 मे 1999 रोजी पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसले आणि झाली होती.
👉 कारगिलमध्ये घुसखोर घुसल्याची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली.जे कारगिलमधील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते.
👉 सर्वात प्रथम 3 मे रोजीच भारतीय सैनिकांना पहाराकरत असताना आढळले की, काही लोकं तेथे हालचाल करत असल्याचे दिसले.प्रथमच द्रास,काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले गेले.
👉 पुढे भारतीय सैन्याने 9 जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या 2 चौकीचा तर 13 जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला.आपल्या सैन्याने 29 जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या 5060 आणि 5100 आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोवला.
👉 तब्बल 11 तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्सवर भारतीय सैन्याने ताबा घेतला,मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतले.
👉 1999 मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून 2,50,000 गोळे आणि रॉकेट डागले गेले.300 पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्सने दररोज सुमारे 5,000 बॉम्ब डागण्यात आले होते.
👉बरोबर 26 जुलै 1999 या दिवशी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेले ‘ऑपरेशन विजय’ यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले होते.
👉 या युद्धात मीराजसाठी अवघ्या 12 दिवसात लेजर गाईडेड बॉम्ब प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली.
👉 भारतीय वायू सेनेने पाकिस्त विरोधात मिग-27 आणि मिग-29 विमान वापरले होते.
👉 या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता.तर सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले होते.
सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा
स्तोत्र:गुगल/इंटरनेट
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे, धुळे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


Leave a Reply