🪩 दिन विशेष:भाग-३.🪩
🎂आज-१९-जुलै🎂
आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत विष्णू नारळीकर यांचा ८५ वा वाढदिवस.
🎂HAPPY🎂BIRTHDAY🎂
डॉ.जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला,गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला,त्याचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणिततज्ञ होते.वाराणशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते.डॉ.नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे.तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला.त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.डॉ.नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले.तेथे त्यांनी बी.ए.एम.ए.आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळवल्या.त्या काळात त्यांनी रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळवली,त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी केली.सर फ्रेड हॉईल डॉ.नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनी केंब्रीज येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरॉटीकल अॅस्ट्रॉनॉमी’ नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली,त्यात डॉ.नारळीकरांचाही महत्वाचा वाटा होता.सन १९६६ ते १९७२ पर्यंत ते या संस्थेशी निगडित होते.सर हॉईल आणि डॉ.नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं.गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला,तो ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे.अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे.हा सिद्धांत असे सांगतो की,वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला,त्यांना तीन मुली आहेत-गीता,गिरिजा व लिलावती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले.त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.)खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले.कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली.डॉ.नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच,पण त्याच बरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली,त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.मराठीच नव्हे,तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत.१९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले.डॉ.भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत.
महान खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरजी यांना ८५ व्या वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴


Leave a Reply