🪩 दिन विशेष: भाग_१. 🪩
१८ जुलै👇महत्वाच्या घटना.
१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.
१९२५: अॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
१९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.
१९८०: भारताने एस.एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
१९९६: तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.
*१८ जुलै👇जन्म.*
१६३५: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०३)
१८४८: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू.जी. ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५)
१९०९: भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९८३)
१९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)
१९१८: नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्म.(मृत्यू:६ डिसेंबर २०१३)
१९२७: पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट मेहदी हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून २०१२)
१९३५: ६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म.
१९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.
१९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
१९७२: अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म.(मृत्यू:१७ एप्रिल २००४)
१९८२: अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म.
*१८ जुलै👇मृत्यू.*
१८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)
१८९२: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)
१९६९: लेखक,कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन.(जन्म:१ऑगस्ट १९२०)
१९८९: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट यांचे निधन.
१९९४: ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ.मुनीस रझा यांचे निधन.
२००१: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.
२००१: वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन. (जन्म: २८ जून १९३४)
२०१२: चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.
२०१३: भारतीय कवी, गीतकार,आणि अभिनेते वाली यांचे निधन.(जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
१९६९: अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply