आज १४ जुलै:भारतीय तार सेवा १० वर्षापूर्वी बंद झाली – बडगुजर. इन

🪩 दिन विशेष भाग-२.🪩
आज १४ जुलै:भारतीय तार सेवा १० वर्षापूर्वी बंद झाली.
गेल्या अनेक पिढ्यांपासून चांगल्या किंवा वाईट बातम्या घेऊन येणारी तार आता आपल्या घरात कधीच येणार नाही.‘तारवाला’ हा शब्ददेखील आपल्या कानावर कधीच पडणार नाही.पोस्टमन कदाचित आपल्या दारी येईलही;पण त्याच्या हातात तार नसेल.कारण,देशात गेल्या १६३ वर्षांपासून सुरू असलेली सरकारची टेलिग्राम सेवा आजपासून इतिहासजमा झालेली आहे. आज या सेवेला देशवासीयांनी अखेरचा भावपूर्ण निरोप दिला.

एकेकाळी तार ही सेवा देशातील सर्वात जलद सेवा म्हणून ओळखली जात होती.नातेवाईकांचे सुख-दु:ख देशाच्या कानाकोप-यात पोहोचविणारी ही सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे.तथापि,शेवटचा टेलिग्राम संग्रहालयात ठेवून या सेवेच्या आठवणी कायम राखण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विज्ञानयुगापूर्वी टेलिग्राम,पत्र, मनिऑर्डर आदी सेवा म्हणजे भारतीयांचा प्राण होत्या. पोस्टमनची प्रतीक्षा करीत नसणारे एकही घर नव्हते.पण,कालांतराने विज्ञान युगाचा विकास होत गेला आणि या विज्ञान युगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली.या युगाने आधी पेजर हे तंत्रज्ञान आपल्या हातात दिले.त्यानंतर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच मोबाईल आला.हळूहळू तंत्रज्ञान विकसित होत गेले.याचा फटका टपाल खात्याचा पत्रव्यवहार आणि तार सेवेला बसला.महिन्या-दोन महिन्यातून एखादीच व्यक्ती तार करण्यासाठी टपाल कार्यालयात यायची.कर्मचा-यांवर हजारो रुपये खर्च व्हायचा आणि मिळकत मात्र काही रुपयांमध्ये असायची.हा तोटा सहन करणे शक्य न झाल्याने सरकारने अखेर तार सेवा कायमचीच बंद करण्याचा निर्णय घेतला.दोन महिन्यांआधीच तसा आदेश प्रत्येक टपाल कार्यालयाला पाठविण्यात आला.१४ जुलै २०१३ पासून ही सेवा बंद करण्यात येईल असे घोषित केले गेले,आज त्यास रस एक दशक म्हणजे १० वर्षे झाली.
स्तोत्र:गुगल/इंटरनेट
संकलन:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे
♨️〰️〰️〰️〰️〰️〰️♨️〰️〰️〰️〰️〰️〰️♨️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*