⚓दिन विशेष भाग_२.⚓ ⚓आज ३० जून⚓ जागतिक सोशल मीडिया’ दिन – बडगुजर. इन

⚓दिन विशेष भाग_२.⚓
⚓आज ३० जून⚓ जागतिक सोशल मीडिया’ दिन.

सोशल मीडिया दिनाचा उदय: तरुण असो की वृद्ध, प्रत्येकजण सोशल मीडियाशी कनेक्ट आहे. सोशल मीडिया आज जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फक्त एका क्लिकने,आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला जाऊ शकतो.हे सर्व सोशल मीडियाद्वारे शक्य झाले आहे.
👉दरवर्षी 〰️ ३० जून हा दिवस जागतिक “सोशल मीडिया डे” म्हणून साजरा केला जातो.त्या पार्श्वभूमीवरच सोशल मीडिया दिन का साजरा केला जातो? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

👉जागतिक सोशल मीडिया दिनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे जगातील संवादाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून सोशल मीडिया कसा उदयास आला याची माहिती प्रत्येकाला करून देणे हेच होय.

👉अलिकडच्या काळात सर्वांच्याच आयुष्यात सोशल मीडियाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅट यांवरचे मेसेजेस पाहत होते.

👉 या आभासी विश्वाचे आयुष्यावर मोठे परिणाम होत आहेत. म्हणूनच ‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’च्या निमित्ताने सोशल मीडियाच्या चांगल्या आणि वाईट बाजूंवरही चर्चा होत आहे.

👉अलिकडच्या काळात, सोशल मीडिया हे जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून उदयास आले आहे.सोशल मीडियाचा वापर करत आपण हजारो मैलांच्या अंतरावर बसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.

इतिहास: 👇👇👇👇
👉 जगभरात पहिल्यांदा 30 जून 2010 ला ‘जागतिक सोशल मीडिया डे’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी जगभरातील सोशल मीडियाचा प्रभाव आणि वैश्विक स्तरावरील सोशल मीडियाचा वापर यासंदर्भातील भूमिकेवर जोर देण्यासाठी जागतिक सोशल मीडिया दिन साजरा करण्यात आला होता.

👉 जगातील पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिक्सडिग्री 1997 मध्ये लाँच झाला होता. याची स्थापना अँड्र्यू वेनरिच यांनी केली होती. दरम्यान 2001 मध्ये दहा लाखाहून अधिक यूजर्स झाल्यानंतर याला बंद केले गेले.
👉आजच्या वेगवान बदलत्या काळात सोशल मीडियाची माध्यमंही बदलत आहेत. तर ही बदलती माध्यमं त्याच वेगाने लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. सध्या ट्विटर,फेसबुक,इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हाट्सअप सारख्या माध्यमांचा कोट्यवधी युजर्स वापर करतात.
दररोज लोक सोशल मीडियावर सुमारे 3 तास घालवतात.जगभरात सुमारे 3.725 अब्ज सोशल मीडिया वापरकर्ते आहेत.सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे 5 लाख नवीन युजर्स जोडले जातात.प्रत्येक सेकंदाला सुमारे 6 नवीन प्रोफाइल तयार होतात. फेसबुकवर सुमारे 27 कोटी बनावट खाती असली तरी, फेसबुकचे बरेच युजर्स अमेरिकेतले आहेत.प्रत्येकाचे फेसबुकवर सरासरी 155 मित्र आहेत. फेसबुकची सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याचे 122.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. दररोज लोक फेसबुकवर सुमारे 35 मिनिटे घालवतात. जानेवारी 2021 पर्यंत भारतात 448 मिलियन सोशल मीडिया युजर्स आहेत. 2020 ते 2021 दरम्यान त्यात 78 मिलियन (+ 21%) वाढ झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे देशातील सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप आहे.त्यानंतर यूट्यूब, फेसबुक,इन्स्टाग्राम आणि ट्विटरचा क्रमांक लागतो. भारतात सोशल मीडिया युजर्स:
व्हॉट्सअ‍ॅप 53 कोटी
यूट्यूब 44.8 कोटी
फेसबुक 41 कोटी
इंस्टाग्राम 21 कोटी
ट्विटर b1.75 कोटी
केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत.फेसबुक,ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांना ही नियमावली बंधनकारक केली आहे.यामुळे केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्या यांच्यात संघर्ष सुरू आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*