पुणे येथील रोटरी क्लब ऑफ वारजे च्या प्रेसिडेंट पदी श्री. राजेंद्र वसंत बडगुजर यांची निवड – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. राजेंद्र वसंत बडगुजर मुळगांव पहुर (जामनेर) सध्या रहिवास रोहन क्रितिका, सिंहगड रोड, पुणे येथे राहतात. त्यांचा मेडिकल इक्युपमेंट चा डिस्ट्रीब्यूशन चा व्यवसाय आहे. ते हा व्यवसाय MIS HEALTH CARE PVT. LTD. व AMETS HEALTH CARE PVT. LTD या फर्म व्दारे हा व्यवसाय सांभाळतात. २००० साली पुण्यात आल्यानंतर त्यांनी या व्यवसायास सुरुवात केली. आपल्या कार्यकुशलता व प्रामाणिकते मुळे अल्पावधीतच या व्यवसायात पुणे सारख्या शहरात जम बसविला. श्री. राजेंद्र बडगुजर यांनी BE Instrumenetation चे शिक्षण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथून घेतले तदनंतर त्यांनी MEM Bio-Medical चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पुर्ण केले.

अतिशय शांत, प्रेमळ स्वभावाचे श्री. राजेंद्र शेठ हे कामा बरोबरच सामाजिक कार्यात सुध्दा अग्रेसर सहभागी होत असतात. ते बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे चे विद्यमान उपाध्यक्ष असून नुकतेच रोटरी क्लब ऑफ वारजे, पुणे चे प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली. यापूर्वी ते रोटरी क्लब ऑफ वारजे, पुणे च्या डायरेक्टर पदी निवड झाली होती.

श्री. राजेंद्र बडगुजर यांच्या धर्मपत्नी सौ. रक्षा राजेंद्र बडगुजर, मुलगी कु. भुमिका व मुलगा चि. निशांत असा परिवार आहे.

रोटरी क्लब ऑफ वारजे, पुणे चे नवनियुक्त प्रेसिडेंट श्री. राजेंद्र बडगुजर यांचे बडगुजर. इन व बडगुजर बहुउद्देशीय संस्था पुणे तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply to Dharmendra Badgujar sir Cancel reply

Your email address will not be published.


*