आज जून महिन्याचा- तिसरा रविवार यंदा १८ जून आंतरराष्ट्रीय पितृदिन.
[FATHER’S DAY.]
पितृदेवोभव:
११३ वर्षापूर्वी जून महिन्यात तिसऱ्या रविवारी त्यावेळी १९ जून रोजी सुरूवात.
पितृदिन. यंदा १८ जून रोजी साजरा होत आहे.काही लोक या दिवसाकडे मदर्स डे म्हणजेच मातृदिनाला पूरक म्हणूनही पाहतात.अपवाद वगळता जगातील प्रत्येक व्यक्तिच्या त्याच्या स्वत:च्या म्हणून यशाच्या मागे खंबीर सूत्रधार म्हणजे प्रत्येकाचे बाबा. पण, आयत्या वेळी होणारा उद्धार वगळता बाबा हा यशाचा पाठीराखा असूनही अनेकदा पडद्यामागचा सूत्रधाराच ठरतो.हे क्रेडीट अनेकदा आईला मिळते.अर्थात ते मिळायलाही पाहिजे. पण, त्या तूलनेत बाबा मात्र या क्रेडीटपासून काहीसे उपेक्षीतच राहतात.
अशा वेळी फादर्स डे साजरा करुन आपल्या पडद्यामागच्या हिरोला शुभेच्छा देणं किंवा त्याच्या कामाचे कौतुक करणं कोणाला नाही आवडणार?
लेकीसाठी आई बनलेल्या बापामुळे सुरु झाला उत्सव…
प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविषयासाठी आयुष्यभर झटत असतात.मुलांना खूप कष्ट पडू नयेत म्हणून ते कामात स्वतःला झोकून देतात.भारतासह जगात सगळीकडे वडील आपली जबाबदारी पार पाडत जगाला सामोरं जाण्यासाठी मुलांना स्वतःच्या पायावर उभं करतात.त्याच वडीलांसाठी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो.
फादर्स डेच्या इतिहासाबाबत थोडेसे मतभेद आहेत. तो पहिल्यांदा कधी साजरा केला याबद्दल दोन वेगवेगळे दाखले दिले जातात.
इतिहासात पहिल्यांदा १९०७ ला व्हर्जिनियामध्ये फादर्स डे साजरा करण्यात आल्याचं म्हटलं जातं पण याची अधिकृतपणे कुठेच नोंद नाही.मात्र त्यानंतर तीन वर्षांनी पहिल्यांदा १०१० मध्ये अधिकृतपणे फादर्स डे साजरा केला गेला.
पण दोन्हींचा उद्देश वडिलांची कृतज्ञता व्यक्त करणे हाच आहे.
व्हर्जिनीयातील एका खाणीमध्ये झालेल्या स्फोटात २१० कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला होता.त्यावेळी मृतांना विशेष श्रद्धांजली वाहण्याचा निश्चय करण्यात आला होता. त्याच वर्षी १९ जून १९०७ रोजी पहिल्यांदा कष्टकऱ्यांच्या मृत्यूनंतर शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा करण्यात आला.मात्र याची अधिकृत नोंद कुठेही नाही त्यामुळेच लोक सोनोरा स्मार्ट डोडने साजरा केलेला फादर्स डे पहिला असं मानतात.
सोनोरा स्मार्ड डोड ही लहान होती तेव्हा तिच्या आईचं अचानक निधन झालं होतं. त्यानंतर डोडचा सांभाळ तिचे वडील विलियम स्मार्ट यांनी केला.एक दिवस जेव्हा डोड प्रार्थना सभेसाठी उपस्थित होती तेव्हा चर्चच्या बिशपनी मातृशक्तीवर उपदेश केला. याने सोनोरा खूपच प्रभावित झाली.
मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर तिने फादर्स डे साजरा करण्याचा विचार केला,त्यानंतर १९ जून १९०९ ला पहिल्यांदा सोनोराने फादर्स डे साजरा केला.तेव्हा लोकांनी तिची खिल्ली उडवली पण वेळोसोबत लोकांना वडिलांचे कर्तव्य निस्वार्थीपणा आणि त्याग यांची जाणीव झाली. त्यानंतर सर्व लोक एकत्र येऊन तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करायला लागले.
अमेरिकेत १९२४ साली तत्कालीन अमेरिकेत राष्ट्रपती केल्विन कोली यांनी फादर्स डे साजरा करण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानंतर तो साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर चार दशकांनी १९६६ मध्ये तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉनसन यांनी घोषणा केली की दर वर्षीच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाईल. तेव्हापासून आजपर्यंत फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶
आपले दुःख मनात लपवून,आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवणारा एकमेव माणूस म्हणजे “वडील”•
बाप हा बाप असतो!
आपल्या मुलाबाळांना कसलीही धाप लागू देत नाही!!
¶¶¶¶¶¶¶¶¶¶
वडील म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता!
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही चूक करता!!
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता! आणि तुम्हाला धीर देते – विश्वास ठेवते जेव्हां तुम्ही हारता!!
¶¶¶¶¶¶¶¶¶¶
बाप असतो तेलवात जळत असतो क्षणाक्षणाला l
हाडाची काडे करूनी आधार देतो मनामनाला ll
¶¶¶¶¶¶¶¶¶¶
आपल्या संकटांवर निधड्या छातीने मात करणाऱ्या व्यक्तीला “बाप”म्हणतात!
¶¶¶¶¶¶¶¶¶¶
वडीलांना इंग्लिश मध्ये फादर (डॅड) म्हणतात पण वडील आणि फादर पेक्षाही बाप हा शब्द त्या खंबीर पुरुषास जास्त शोभून दिसतो. कारण बाप हा बापच असतो. अनकेदा आपण म्हणतो कि बाप झाल्याशिवाय बापाच महत्व समजत नाही. आणि हे खरच आहे. ज्या वेळेस बाळ जन्माला येत त्या वेळेस बाप आईशेजारी किंवा पाळण्यात ठेवलेल्या आपल्या लेकराला किंचितस डोकावुन पाहतो. बाप हा असा प्राणी आहे ज्याला आनंद दाखवता येत नाही आणि दु:खही सांगता येत नाही. नऊ महिने पोटात वाढलेल्या लेकरा प्रती ज्या आईच्या भावना असतात तेवढ्याच बापाच्याही असतात. बाप झाल्याचा त्याला जेवढा आनंद असतो, तेवढीच नऊ महिने त्रास सोसलेल्या, आपल्या बायकोच्या प्रसूती कळाचीही त्याला जाणीव असते. आईचं बाळापायी असलेल ममत्व त्याने तेव्हाच स्वीकारलेल असतं.
आपल्या समोर आजपर्यन्त आपल्या वडिलांची प्रतिमा खूप वेगळ्या प्रकारे समोर आणली गेलीय. म्हणजे निष्काळजी,मारझोड करणारा,ओरडणारा,रागीट अस वेगळंच काहीतरी पात्र रंगवल गेलय. त्यात आईच्या प्रेमाला कायमच महत्व दिल गेलय. ते महत्व नाकारण्याचा प्रश्नच नाही, पण आईच्या मायेच्या पदराआड बापाचां काळीज कायम झाकल गेलय हे मात्र नक्की. खरतर आईने प्रेमळ होऊन आणि बापाने कठोर होऊन संसाराचा balance सांभाळावा लागतोय. त्याविषयी या दोघा मध्ये अबोल करारही झालेला असतो. बाप ओरडला खवळला किंवा मारल तर आईने सावरायच असत. पण त्यामुळेच बापाचा धाक किंवा भीती निर्माण होते आणि ती आपल्यात आयुष्यभर राहते. मुल रुसल्यावर त्याला कस मनवायच हे बापाला कळत नसत, म्हणून जर आपण आईकडे एखादा हट्ट केला आणि आईने नकार दिला तर त्या वेळेस बाप गपचूप खिशातून शंभर पाचशे ची नोट काढून देतो. त्यावरुन त्याला आईचे बोलणे देखील खावे लागतात. कारण त्या वेळेस आईचा महिन्याचा हिशोब बिघडलेला असतो… आणि बापाला फक्त रुसलेल्या मुलाच प्रेम परत मिळवायचं असत. त्याला वाटत हा मार्ग सोपा आहे.
तुम्ही सर्वानी आपल्या वडिलांची प्रतिमा बालपणापासून आठवून पहा, आपल्याला दिसेल कि आपले वडील मूकपणे कधी घराची सावली तर कधी माउली बनून उभे राहिलेले आहेत.बऱ्याच जणांची आई शक्यतो हाऊसवाईफ असल्याने, म्हणजे ती घरातच असल्याने आयुष्यातील खूप जास्त वेळ आई सोबत घालवायला मिळतो, त्यामुळे आपोआप मित्रत्वाचे bonding तयार होत. तस वडिलांशी होत नाही कारण वडील घर चालविण्यासाठी काम किंवा व्यवसाय निमित्त १० ते १२ तास घराबाहरे असतात. कामावरून आल्यावर थकलेले असल्याने थोडासाच वेळ मुलांशी आणि बायकोशी बोलायला मिळतो,त्यातही ते आईकडून मुलांचे शिक्षण क्लासेस अडचणी त्रास याबद्दल माहिती काढून घेतात. नकळत त्यावर उपायही तयार ठेवतात, अनेकवेळा वडिलांच्या प्रोफेशनमुळे काही फोन कॉल्स घरात आपल्यासमोर होतात, त्यात अनेकदा वडील समोरच्यावर चिडतात ओरडतात भांडतात. आपल्याला वडिलांशी भीती वाटण्याचे हेही एक कारण असाव. खरतर बाहरे च्या जगातील चित्रविचित्र स्वभावाची माणस, कामातील एवढे टेन्शन प्रॉब्लेम सांभाळून त्यांना घराकडे लक्ष द्याव लागत. आणि हे खरच अजिबात सोपं नाहीहे.मुळात पुरुष जात ही पराक्रमी धैयाशाली कणखर राकट समजली जाते. आपल्या आयुष्यातील पहिला रोलमॉडेल आपला बाप असतो, त्याच्याकडे पाहून आपण नकळत त्याच्यासारखेच कणखर, संयमी बनत चाललेले असतो. आपल्या कुटुंबासमोर हळवं होतानाही त्या बापाला अनेकदा विचार करावा लागतो. कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याच्या डोळ्यात पानी येत नाही…म्हणजेच येऊनच देत नाही. उलट त्या प्रॉब्लेम मधुन आपल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी तो अंग झटकून, ताकत लावून कामाला लागतो. खूपच भरून आल तरी कुणाला दिसणार नाही, अशा ठिकाणी एखाद्या कोपऱ्यात जाऊन रडतो. त्याला सगळ्यांसमोर रडायचं नसत कारण जे कुटुंब मला strong समजतं,त्यांच्यासमोर छोट्या छोट्या संकटात मी जर रडलो तर उद्या संकटात लढण्याऐवजी रडण्याची सवय लागू शकते.एवढा विचार तो आपल्याला घडविताना पावलोपावलावर करत असतो.पण तोच बाप आपल्या जीवापाड जपलेल्या मुलीला वाटी लावताना कोसळून रडतो की निर्जीव वास्तुनाही पाझर फुटेल.
ज्या वेळेस आपल्या डोळ्यासमोर आईवडिलांचे चेहरे उभे राहतात तेव्हा हसणारी लाजणारी ओल्या डोळ्यांची आई दिसते, तर निर्भीड, निस्तेज चेहऱ्याचा आणि सुकलेल्या डोळ्यांचा बाप दिसतो. खरच बाप होण्यासाठी आभाळाच काळीज व्हावं लागत. आई जर घराचा आत्मा असेल तर वडील शरीर आहेत. आई जर घरातील आनंद असेल तर वडील आधार आहेत. ज्यांना वडील नाहीत किंवा वडील लवकर गेल्याने अंगावरील जबाबदारी पडलीय ती लोक वडिलांचं महत्व चांगल्या प्रकारे समजू शकतात. घरातील मुलीला त्रास देण्याअगोदर समोरच्याच्या नजरेसमोर त्या मुलीच्या बापाचा करारी चेहरा असतो, ज्या मुलींना बाप नसतो तिथे वाईट नजरांची हिम्मत वाढलेली असते. म्हणून तर वडिलांना बाप म्हटल गेलय.
मुलांच्या शिक्षणापासून मुलीच्या लग्ना पर्यन्त असंख्य तडजोडी करण्यात त्या बापाच आयुष्य निघून जात. आयुष्यभर अभिमानाने छाती काढून जगणारा बाप, मुलाच्या ऍडमिशनसाठी आणि मुलीच्या लग्नासाठी मात्र कुणासमोरही हात जोडायला मागे पुढ पाहत नाही. कधीच शर्टाची इस्तरी मोडू न देणाऱ्या बापाचा शर्ट तेव्हा मात्र चुरगळलेला असतो. त्याच्या बनियनलाला पडलेली छिद्रे आणि घासून गोटा झालेली चप्पल त्याच्या काटकसरीची जाणीव करून देते. चार पैसे वाचावेत म्हणून चष्म्याची काच न बदलणारा बाप मुलांना मात्र नवीन दृष्टी देण्यात कसलीच कसर बाकी ठेवत नाही. आपण एखादी गोष्ट achive केल्यावर घरात आई आपले पापे घेत,गोंजारत असते तेव्हा बाप बाहेर अभिमानाने माझ्या मुलाने-मुलीने हे करून दाखविले म्हणत पेढे वाटत अभिमानाने सांगत असतो.खिशात एक रुपया नसतानाही त्या पेढ्यासाठी कुठून पैसे अरेंज करतो त्याच त्याला माहीत.
मित्रांनो तुम्ही जेवढं आईला समजून घेता तेवढ वडिलांनाही समजून घेत चला.आज जर तुम्ही आत्मसन्माने जगत असाल, कुठल्याही संकटात तुम्ही कच खात नसाल,तुमचा स्वाभिमान प्रचंड जागरूक असेल तर ही सगळी शिकवण तुमच्या वडिलांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला मिळालेली आहे, हे अजिबात विसरू नका.आईच दुध जर आपण विसरत नाही, तसच बापाच्या कष्टाचा पण विसर पडू देऊ नका.
llदेव तुल्य आईबाबा माझेll
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶
वडिलांची🙏जागा
.
जगात वडिलांची जागा कोणालाच घेता येत नाही,हे प्रत्येकाने लक्षात ठेवूनच नेहमी वागावे.!
वडील आहे म्हणून तुम्ही आहात हे ध्यानात ठेवा.!!
१. वडिलांच्या रागाला “सहन” करायला शिका!तरच तुम्ही “लायक” व्हाल.!
२. कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडील जे सांगतील ते “शांतपणे” ऐका!
३. वडिलांच्या समोर “आवाज वाढवून बोलू” नका!”नम्रतेने” बोला!
४. वडिलांचा “आदर” करा!त्यामुळे तुमची मुलं तुमचा “आदर” करायला शिकतील!अन्यथा नाही.
५. वडिलांचा “सन्मान” करा!यातच तुमचे “भले” होणार आहे!
६. वडिलांचे “म्हणणे” ऐका!तुम्ही नक्कीच “खूश” रहाल!
७. वडिलांच्या समोर तुमची “नजर झुकवून” बोला!
८. वडील म्हणजे एक “पुस्तक” आहेत,ज्यामध्ये “अनुभव” लिहिले जातात.
९. वडिलांचे “अश्रू” तूमच्यासमोर “वाहू” देऊ नका!
१०. वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं “व्यक्तिमत्त्व” आहे की,ते कोणत्याही “मापात मोजता” येणार नाही!आईची “जागा” कोणीही घेऊ शकत नाही. पण “बाप” तो “बापच” असतो.
११. आईच्या पायाखाली “स्वर्ग” आहे.पण “बाप” त्या स्वर्गाचे “दरवाजे” असतो. विचार करा!जर हे “दरवाजे”च उघडले नाहीत,तर “स्वर्गात” प्रवेश कसा मिळवाल?
१२. “बाप”,मग तो शिक्षित असो वा अशिक्षित-अडाणी; ज्यालाउन्हा-तान्हात सुद्धा मुलांच्या “जीवनाचे कल्याण” करण्याची “काळजी” असते.तुम्ही “स्थिरस्थावर” झाल्याशिवाय बापाला “चैन” पडत नाही.
१३. बाप असो वा वडील,तो रागीट असो वा व्यसनी!पण आपल्या मुलांना “प्रेम” करण्यात तो कधीच “कमी” पडत नाही.
१४. रागावलेला बाप “शांत” झाला की,त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी “कासावीस” होतो.हे बाप झाल्याशिवाय “कळतच” नाही.
१५. लक्षात ठेवा! सूर्य “आगीचा गोळा” आहे, “धगधगता अग्नी” आहे. पण मावळला की,सर्वत्र “अंधार” आहे. म्हणूनच म्हणतो, “बाप” बापच असतो.आई सारखंच, “बापाची जागा”सुद्धा कोणालाही घेता येत नाही.मन दडपून मुलांना “सुखात” ठेवण्यासाठी वरून “आनंदित” आणि हृदय पिळवटून “रडणारा” बाप कोणालाही कळणार नाही.
१६. ज्याने बापाचे “काळीज दुखावले”,तो “आयुष्यात कधीच हसत” नाही. आणि ज्याने बापाला “आयुष्यभर आदराने” वागवले, तो “आयुष्याला दोष” देत कधीच कधीच “रडणार” नाही.
१७.आपल्या वडिलांना “मान-सन्मान” देऊन बघा!आयुष्यात कधी काहीच “कमी” पडणार नाही!हे लक्षात ठेवा!
“आजच्या दिवसापासून आपण पुढील इंग्लिश वाक्य कायमस्वरूपी ध्यानात ठेवण्याचा संकल्प करूया”
“My DAD hereafter will not be SAD”
ll🔱🙏शुभम् भवतु:🙏🔱ll
प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



Leave a Reply