सागरी कासवांचे महत्त्व जगभरात पटवून देण्यासाठी दरवर्षी १६ जूनला जागतिक सागरी कासव दिन साजरा केला जातो. सागरी कासवे ही हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. त्यांचे एक विशिष्ट जीवनचक्र असते.
सागरी परिसंस्थेत कासवे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सध्या जगभरात सागरी कासवांच्या ऑलिव्ह रिडले, हॉक्स बिल, ग्रीन, लॉगर हेड, लेदर बॅक, फ्लॅट बॅक आणि केम्प्स रिडले अशा सात जाती आढळतात. ज्युरासिक काळापासून त्यांच्या शरीररचनेत काहीही बदल झालेला नाही. अजूनही तग धरून असणारी ही कासवे आता मात्र वेगाने कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
या जीवांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी, त्याचबरोबर सागरी कासवांबद्दल जनजागृती करण्यासाठी. १६ जून हा दिवस जागतिक सागरी कासव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.हा समुद्री कासवांच्या जीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. आर्चि कार्र यांचा जन्मदिवस..! डॉ. आर्चि कार्र यांनी समुद्री कासवांचा अभ्यास करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. त्यांच्या संशोधन आणि मार्गदर्शनामुळे समुद्री कासवांना असलेल्या धोक्यांकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्यांच्या या कार्यामुळे समुद्री कासवांच्या संवर्धनाला सुरुवात झाली आणि भविष्यात या कामासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा समुदाय तयार झाला, अनेक शास्त्रज्ञांच्या विचारांना चालना मिळाली.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत, भारतात सागरी कासवांना संरक्षण दिले गेले आहे. सध्या, जगभरात अनेक ठिकाणी समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले गेले आहे. अनेक ठिकाणी…
‘समुदाय आधारित कासव संवर्धन’ केले जात आहे. आणि ‘कासव’ हेच तेथील लोकांसाठी उपजीविकेचे साधनही झाले आहे. या प्रयत्नांमुळे ऑलिव्ह रिडलेसारख्या प्रजातींच्या कासवांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात, ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या संघटनेमार्फत २००२ साली समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले. पुढे, सह्याद्री निसर्ग मित्र आणि वन विभागामार्फत किनाऱ्यांवरील गावांमधील रहिवाशांना समुद्री कासवांच्या संवर्धनाचे प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्रात, कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान प्रयत्नपूर्वक कासव संवर्धनाचे काम करीत आहेत. त्यांच्यामार्फत सागरी कासव दिनानिमित्त किनाऱ्यालगतच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच लोकवस्त्यांमध्ये अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. या प्रयत्नांमुळे सागरी कासवांच्या संवर्धनास हातभार लागत आहे.
कासव हा वन्यप्राणी असून त्याला घरात जिवंत ठेवणे, बंदिस्त करणे हा गुन्हा आहे़. वन्यसंरक्षण कायदा १९७२ अन्वये कलम ९ नुसार संबंधितांवर कारवाई होऊ शकते़ नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे महत्त्वाचे आहे़ सुखसमृध्दीसाठी कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे़.
जागतिक🐢सागरी🐢कासव दिन ऐवजी अमेरिकन लोक ‘रेस्कू दिन’ म्हणून साजरा करतात.
आपले पूर्वज🐢 कासवाचा खूप सांभाळ करत.प्रत्येक विहीर,बारव,तळी,यात 🐢कासव असत पण आज चोरटी शिकार,व्यापार, पाण्याचा अभावामुळे त्यांची वसतीस्थाने नष्ट झालीत.आज चित्रातून🐢कासव पहावी लागत आहेत.*
कासव हा पाण्यात आणि जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे,त्याच्या सात प्रमुख जाती आहेत.भारतात त्यापैकी चार प्रकारची 🐢कासवे आढळतात.
“ऑलिव्ह रिडले कासव,ग्रीन टर्टल,हॉक्स बिल टर्टल,सागरी किंवा समुद्री कासव.ही भारताच्या पूर्व आणि पश्चिाम किनाऱ्यावर आढळतात.
ऑलिव्ह रिडले: ही कासवे तपकिरी रंगाची असून ती ओरिसाच्या गोहिरमाथा येथील सागर किनाऱ्यावर आढळतात. महाराष्ट्रात कोकणपट्टीतील समुद्र किनाऱ्यावरही ती आढळतात.
ग्रीन टर्टलः म्हणजे हिरवे कासव.ते पिवळ्या,पांढऱ्या रंगाचे गुळगुळीत पोट असलेले व टणक पाठीचे दिसते.भारतात पूर्व व पश्चिम किनार्यारवर ते दिसून येते.
हॉक्स बिल टर्टल: म्हणजे चोचीसारखे तोंड असलेले कासव. याची लांबी १७० से.मी. व वजन ५०० ग्रॅम असते.पाठ मऊशीर आवरणाने झाकलेली असते. त्याचा जबडा कात्रीसारखा असतो.भारताच्या नकाशाच्या भूभागापासून थोडे दूर असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर ही कासवे आढळतात.
कासवाच्या🐢पाठीचा दागिन्यांसाठी वापर होत असल्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे. ‘वेळास’ येथे सागरी संवर्धन केंद्र आहे. वेळास हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड- दापोलीजवळ आहे.वेळास येथे ‘’कासव महोत्सव’’ ही आयोजित केला जातो.*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे- ऑलिव्ह रिडले येथे कासवाचे प्रजनन व संवर्धन होते.जगामध्ये २२० कासवांच्या🐢जाती सापडलेल्या आहेत.
लेदर बॅक टर्टल: हे सागरी कासव ३०० किलोग्रॅम वजनाचे असते. भूचर म्हणजे जमिनीवर अधिक काळ राहणारे कासव शंभर ग्रॅम वजनाचे असते.
भारतात ‘ट्रायोनिक्स’ प्रजातीतील दोनतीन कासवे आढळतात.कासवांची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यांना तिसरी पापणीसुध्दा असते. शेपटीच्या खालच्या भागात आतडे, मूत्रवाहिन्या व प्रजनन वाहिन्या असतात. कासवे ही ठराविकच काळात प्रजनन करतात असे नाही. मादी मागील पायांनी जमिनीत किंवा वाळूत खोल खड्डा खणून त्यात अंडी घालते. तसेच माती,वाळू आणि वनस्पतींनी अंडी झाकून टाकते.कासवाची अंडी वाटोळी असतात,त्याचे कवच टणक असते.सागरी कासव एकाचवेळी पाच अथवा अधिक अंडी घालू शकते. जमिनीवर राहणाऱ्या कासवाची पिल्ले ४५ ते ५५ दिवसात म्हणजे सर्वसाधारणपणे दोन-तीन महिन्यात मातीतून वर येऊ लागतात.त्यावेळी आजूबाजूची वाळूमय जमीन थोडी हलू लागते.कासवाचे आयुष्य शंभर ते एकशे पन्नास वर्ष असते.भारतात कासवांपासून ढाली तयार केल्या जातात.
ऑलिव्हर रिडले:_ या कासवाच्या दुर्मीळ प्रजातीचे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून होणारे मृत्यू रोखण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिकल मेट्रॉलॉजी’(आयआयटीएम) मधील शास्त्रज्ञांनी बंगालच्या उपसागरातील त्यांची आयुष्यरेषा शोधली आहे.
इंग्लंड येथून निघणाऱ्या- ‘’मॉरिने डिओसीसी’’ या जागतिक नियतकालिकात ही संशोधनपर माहिती प्रसिध्द झालेली आहे.कासव हा वन्यप्राणी असून त्याला घरात जिवंत ठेवणे,बंदिस्त करणे हा गुन्हा आहे़ वन्यसंरक्षण कायदा १९७२ अन्वये कलम ९ नुसार संबंधितांवर कारवाई होऊ शकते़. नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे महत्त्वाचे आहे़. सुखसमृध्दीसाठी कासव घरात ‘फीश-पॉट’मध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे़.
आज,”जागतिक सागरी 🐢कासव 🐢 दिना” निमित्ताने आपण सर्व मिळून 🐢कासव 🐢संवर्धनाचे काम हाती घेऊ.
🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢


Leave a Reply