माझी वसुंधरा अभियानात” बोराडी नंबर वन….कर्तव्यदक्ष शिलेदार श्री चंद्रकांत बडगुजर सर यांचा सत्कार – प्रा. श्री ईश्वर बडगुजर सर, मुकटी

माझी वसुंधरा अभियानात” बोराडी नंबर वन….कर्तव्यदक्ष शिलेदार श्री चंद्रकांत बडगुजर सर यांचा सत्कार

थोर समाजसेवक, शिक्षण महर्षी व स्वातंत्र्य सैनिक स्व.श्री अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या बोराडी गावाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. सर्वत्र बोराडीकरांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. रंधे परिवारातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनीच दिलेल्या कामात स्वतःला झोकून दिले होते. रंधे परिवाराचे अथक प्रयत्न व त्यांना दिलेली कर्मचारी व ग्रामस्थांनी मोलाची साथ यामुळेच बोराडी गाव नंबर वन ठरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवणाऱ्या बोराडी गावात मोलाचे सहकार्य करणारे कर्तव्यदक्ष शिलेदारांचा सत्कार नुकताच करण्यात आला. त्यात किसान विद्या प्रसारक संस्थेचे बनुमाय रंधे विद्यालय बोराडीचे अत्यंत कर्तव्यदक्ष व धडाडीचे तरुण तडफदार शिक्षक श्री चंद्रकांत सुभाष बडगुजर यांनीही वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून वसुंधरा अभियानात सहभाग घेतला. इतरांप्रमाणेच कठोर परिश्रम घेतले. अशा अनेक कर्तव्यदक्ष शिलेदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श शिक्षक श्री चंद्रकांत बडगुजर सर यांचे बडगुजर. इन टिमकडून व अ. भा. ब. स. युवक समिती कडून मनःपूर्वक अभिनंदन💐 व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*