पनवेल येथे राहणारे,व मुळ गाव धुळे येथील श्री. भालचंद्र वामन बडगुजर यांची दिनांक ३१ में २०२३ रोजी, भारतातील पहिल्या क्रमांकाचे व जगातील प्रमुख बंदरमध्ये नावाजलेल्या जे. एन.पी.ए. (JNPA) उरण या कंपनीमध्ये ३३ वर्ष ५ महिने प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली. त्यांचा सम्मान समारोप जे. एन. पी .ए. या कंपनीमध्ये पार पडला.
श्री भालचंद्र वामन बडगुजर यांचा जन्म दिं १२/०५/१९६३ रोजी झाला, त्यांनी धुळे आणि मुंबई येथे शिक्षण पूर्ण केले. त्या नंतर जानेवारी १९९० मध्ये त्यांनी जे एन पी टी येथे टेक्निशियन या पदावर ३३ वर्ष ५ महिने प्रदिर्घ नोकरी केली व टेक्निशियन या पदावरून निवृत्त झाले.
स्वभावाने शांत व मनमिळाऊ असलेल्या श्री भालचंद्रशेठ यांना त्यांची पत्नी सौ. वैशाली ( पनवेल नवी मुंबई बडगुजर समाज महिला अध्यक्ष) यांनी त्यांच्या प्रगती मध्ये मोलाची साथ दिली. त्यांचा मुलगा चिं. तुषार हा ( बी.ई) मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून सध्या पुणे येथे ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून नोकरी करीत आहे.
श्री. भालचंद्र वामन बडगुजर, यांना आपण शुभेच्छांसाठी 9869551580 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
श्री भालचंद्रशेठ हे स्वकर्तृत्वावर गरीब कुटुंबातून, अनेक वर्षे मेहनत घेऊन पुढे आलेले आहेत. श्री. भालचंद्रशेठ यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांच्या हातुन समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त आपणा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा.
श्री. भालचंद्र वामन बडगुजर यांच्या कार्यकाळातील विविध क्षण व आठवणी










आपले निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे जाओ आपले आरोग्य चांगले राहो आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐