आज ८ जून🌎जागतिक महासागर दिन🌎 – बडगुजर. इन

🌎आज ८ जून🌎जागतिक महासागर दिन🌎
आज जागतिक पातळीवर सन १९९२ पासून दरवर्षी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो.
८ जून हा दिवस जागतिक महासागर दिवसाचं महत्त्व:;समुद्रातील प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यात यावी या संदर्भात १९९२ मध्ये कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत एक प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघाने २००७ मध्ये मान्यता दिली.
‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने जागतिक महासागर दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे.
आपल्या जीवनात पाण्याचं किती महत्त्व आहे, हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच हे महासागर संरक्षिले जावेत त्यांची नैसर्गिकदृष्ट्या काळजी घेतली जावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
दरम्यान,जागतिक महासागर दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था,अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक एकत्र येऊन समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच समुद्रांची योग्य काळजी घेतली नाही तर समुद्रीजीव देखील नष्ट होऊ शकतात. म्हणूनच, तब्बल दहा लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला समुद्राची काळजी घेणं गरजेचं आहे.वाढत्या जागतिकीकरणा सोबतच प्रदुषणाचं प्रमाणही वाढ आहे.केवळ जमिनीवरच नव्हे तर आता नदी, कालवे, समुद्र यांमधील प्रदुषणाचं प्रमाणही वाढतांना दिसत आहे.
संपूर्ण पृथ्वीचा ऋद्धीसिद्धीदायक जवळपास ७१% भाग समुद्राने व्यापला आहे. हे आपल्याला माहीत आहे. समुद्रात अनेक प्रकारचे जीवजंतु,राणी आणि वनस्पतींचे जीवन आहे. संपूर्ण जगासाठी समुद्राचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मानवी जीवनात समुद्राच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा जागतिक महासागर दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. तसेच,शाश्वत विकासासाठी महासागर आणि सागरी संसाधनांचे जतन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे.

आपल्या महासागरांमध्ये ८० टक्क्यांहून जास्त जैवविविधता जोपासली जाते. ३ बिलियन नागरिक मस्यहारावर अवलंबून आहेत. १० पैकी १ व्यक्ती उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहे.
समुद्र हा वातावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि जगातील लाखो लोकांकरिता पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. समुद्र पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पण प्लास्टिकचे प्रदूषण, कचरा तसेच दूषित गढूळ आणि केमिकल युक्त पाणी प्रदूषण ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावत आहे. विशेषत: समुद्राच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे सागरी जीवांचे, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे.
महासागर अर्थात समुद्र आपल्या पोटात त्यांच्या आजूबाजूच्या अनेक छोट्या छोट्या जीवांना सामावून घेतो, त्यांचे पोषण करतो. तसेच आपल्या किनाऱ्यावर विविध प्रकारच्या वनस्पतींचे पोषण संरक्षण करतो. विशेषतः मानवजातीला जल, वायू, तेल, खनिज संपत्ती औषधे सारख्या अनेक मार्गांनी उपयोगी पडतो रोजगार देतो. अशा या जागतिक महासागर दिनानिमित्त समुद्र स्वच्छ ठेवण्याचा आणि समुद्राला संरक्षण देण्याचा संकल्प करूया. लोकांमध्ये जागरूकता पसरवूया.

समुद्र आपली आन-बान-शान!
समुद्र आमचा मान-अभिमान!!
आपल्यापैकी अनेकांना रोजगार देणारा,सागरी अन्न पुरवणारा व अनेक जल जीवांनी समृध्द असलेला हा अथांग महासागर आणि त्याचा किनारा स्वच्छ ठेवणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे.

महासागराचे रक्षण करण्यासाठी आपण काय करायला हवे? समुद्रात प्लास्टिकचा कचरा टाकणे बंद करावे. कारण हा कचरा समुद्रातील इतर जीव तसेच मासे खातात. ज्यामुळे हे इतर जीव आणि मासे मरण पावतात. आणि कधीकधी तीच मासे आपण खात असतो. ज्याने रोगराई वाढते. आणि आपल्या आरोग्यास हानी पोहचत असते. कारखान्याचे रासायनिक पदार्थ असलेले दूषित पाणी, शेतीतील खराब सांडपाणी तसेच इतर घरगुती सांडपाणी रासायनिक पदार्थ असलेले दुषित पाणी समुद्रात टाकु नये. याने समुद्र हा मासेमारी करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, पोहण्यासाठी स्वच्छ तसेच योग्य राहत नसतो.याने समुद्रातील इतर जीवांना देखील हानी पोहचते. तसेच ते समुद्राचे पाणी पिण्यायोग्य, मासेमारी करण्यायोग्य तसेच पोहण्यायोग्य देखील राहत नसते.त्यातच जर हे पाणी कोणी पिले तर त्याच्या आरोग्यास हानी पोहचु शकते.!
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*