आज ५ जून जागतिक पर्यावरण दिवस – बडगुजर. इन

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिवस.
संतांनी फार पूर्वीच निसर्गाचे,वृक्षांचे व पर्यावरणाचे महत्व अधोरेखित केलेले आहे.जगद्गुरू संत तुकोबारायांनी आपल्या संतवाणीतून वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे हे फार पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे.
आज त्याची प्रकर्षाने जाणीव आपल्याला होत असल्यामुळे अशाप्रकारचा दिवस साजरा करून आपल्याला आपल्या जिम्मेदारी ची जाणीव करून देणं गरजेचं झालं आहे.
पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा दिवस आपण साजरा करत असतो.
पहिल्यांदा आपण वृक्षसंवर्धनामुळे आपले ढोबळमानाने काय फायदे आहेत ते पाहूयात.!
कोरोना काळात आपल्याला प्राणवायूची कमतरता खूप प्रकर्षाने जाणवली.!
ऑक्सिजन लेव्हल ९५ च्या खाली आलेवर भल्याभल्यांची घाबरगुंडी उडालेली आपण पाहिली रस असून वृक्ष जोपासणे जरूरीचे असलेची जाणीव सर्वांना होत आहे.
झाडांच्या मुख्य कार्यांम ध्ये:
👉कार्बन-डाय-ऑक्साइडचे शोषण व ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचे उत्सर्जन..
👉वातावरणातील हवा स्वच्छ करणे.
👉पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे.
👉जागतिक तापमान वाढ रोखणे ..
👉प्रदूषण कमी करणे..

आपल्या समोर असलेल्या गंभीर समस्या
👉जागतिक तापमान वाढ 👉जल प्रदूषण
👉वायू प्रदूषण
👉वाढती लोकसंख्या

आपण करू शकत असलेल्या↕️गोष्टी:
👉आपल्याला शक्य होतील तेवढी झाडे लावणे व त्यांची योग्य ती काळजी घेऊन ते वाढवणे
👉 कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.
👉नदी पत्रांचे शुद्धीकरण व सुशोभीकरण.
👉 प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरणे.
👉शक्य तेवढी इंधन बचत करणे.
👉पर्यावरणाचे महत्त्व आपण समजून घेऊन इतरांना ही ते सांगणे…

पर्यावरणा शिवाय मानवी जीवनाचे अस्तित्व शक्य नाही त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई आहे.आपल्या मातेसमान पृथ्वीची आपण सर्वांनी मिळून काळजी घेतली पाहिजे हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
🌴🪴🌴🪴🌴🪴🌴🪴🌴🪴🌴🪴🌴🪴🌴
५ जून जागतिक पर्यावरण दिन,या दिवशी आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतो.त्यासाठी विविध कार्यक्रमांचं नियोजन करतो. परंतु पर्यावरण ubरक्षण ही गोष्ट मूळ कशावर अवलंबून आहे आणि ते टाळता येणे शक्य आहे का याचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा विचारांचा पूर्ण गोंधळ उडालेला असतो.
आपल्या भारताचाच विचार करू भारताची लोकसंख्या जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तेहेतीस कोटी होती आणि आज ती जवळपास १३५+ कोटी झाली.म्हणजे शंभर कोटीची भर पडली ती फक्त सत्तर वर्षात.परंतू आताही भारताची जमीन १९४७ साली जेव्हढी होती तेव्हढीच आहे.जेव्हढं पाणी होतं तेव्हढंच पाणी आहे.पण लोक मात्र १०० कोटीने वाढले.या सर्व १०० कोटी लोकांची राहण्या-खाण्याची सोय त्यांना सुख सोयी देण्याची व्यवस्था आपल्याला करणे भाग आहे. लोकसंख्या तर आपण काही कमी करू शकत नाही.
तैहेतीस कोटी लोकांचे ऐवजी १३५ कोटी लोकांची सोय करण्यासाठी तेव्हढी घरे, तेव्हढी मार्केट,इतर सुखसोयी एकूण संपूर्ण पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेतच,त्यासाठी आपण उपलब्ध असलेली जमिन वापरणार.उपलब्ध असलेल्या पाणीसाठाच वापरणार. उपलब्ध असलेली खनिजे वापरणार,वगैरे वगैरे.म्हणजे तेवढ्या संख्येने झाडे कमी होणार,जंगले कमी होणार,पाणीसाठे कमी होणार.
एक चादर एका माणसांसाठी वापरायच्या ऐवजी जर चार माणसांसाठी वापरायची ठरवली तर ओढाताण होणारच.चादर फाटणारच.
त्याला पर्याय काय?
सध्या आणखी नवीन नवीन शोध लागत आहेत. नवीन नवीन उत्पादने निर्माण होतायत.त्या सगळ्यासाठी नैसर्गिक शक्तींचा वापर होणारच आहे.तसेच नवीन नवीन औषधांचे शोध लागतात नवीन नवीन आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत गेल्या शंभर वर्षांमध्ये असे म्हटले जाते की माणसाचे आयुष्य सरासरी ६० वर्षावरून ८० वर्षापर्यंत जात आहे.बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येची भर सतत पडणारच आहे. त्यासाठी कोणताही उपाय किंवा कोणतीही उपाययोजना माणसांच्यावर लादता येत नाही.लोकसंख्या वाढ कमी करता येत नाही,त्यासाठी कुणी समाज प्रबोधन करतानाही दिसत नाही. फक्त पर्यावरण रक्षणाचा कंठशोष करून पर्यावरणाचे रक्षण होणे शक्य आहे का? मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळे त्याबाबत आपण काहीही उपाय योजना करण्यास असमर्थ आहोत. माझ्याच आयुष्याचा प्रवास पाहिला तर ५० वर्षापूर्वी मी पाहिलेली मुंबई आणि पुणे आणि आज मी पहात असलेलं मुंबई व पुणे तसेच पन्नास वर्षांपूर्वीची त्याहीपेक्षा लहान शहरे आणि खेडेगावे सुद्धा.त्याचप्रमाणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावाच्या कमी होत असलेल्या पिकाऊ जमिनी आणि उत्पादन वाढ व माणसांच्या सवयीमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे.पर्यावरण रक्षणाचे प्रमाण व प्रयत्न पाहिल्यानंतर फक्त एवढेच जाणवते की आज पासून एक हजार वर्षांनी पृथ्वीचा विनाश होणार असेल तर फक्त तो ५-६ वर्षांनी पुढे ढकलता येईल यापेक्षा त्या प्रयत्नांना फार यश येणार नाही. हे क्षीण प्रयत्न ही सुद्धा चिंतेची बाब आहेच. आपण लोकसंख्येची वाढ कमी करू शकत नाही. प्रदूषणाचे प्रमाण कमी करू शकत नाही. पाण्याचा वापर कमी करू शकत नाही. माणसांच्या सवयी बदलू शकत नाही. जंगले वाचवू शकत नाही. प्राणीजीवन वाचवू शकत नाही. वनस्पती संवर्धन ज्या प्रमाणात होत आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त वनस्पतींचे नष्टचर्य सुरू आहे.
माणसाच्या कोणत्याही सवयींना अमुलाग्र बदलणे हे अशक्य आहे. आपल्याला विकास पाहिजे आणि हा विकास वरील नष्टचर्य चालू ठेवूनच होऊ शकला पाहिजे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यास पर्यावरण नष्ट करून पृथ्वी नष्ट करणे व संपूर्ण मानवजातीचे नष्टचर्य याचा वेळ वाढवणे यावर आपण काहीही करू शकत नाही.
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे. याशिवाय आपल्या हातात काय आहे.फक्त आपण मनातल्या मनात म्हणत राहायचे
बुडते हे जन देखवेना डोळा.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🌳पर्यावरण🌳
पृथ्वीतलावर भयावह वातावरणl
सावट कोरोनाचे दाट आवरणll

मनी असावा विचार सर्वसाधारणl
करा निर्धार अन् थांबवा प्रदुषणll

सारेच पूजतात सत्यनारायणl
लावूनी वृक्ष पूजा वृक्षनारायणll

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेl
निसर्गासारखा २रा सोयरा नाही रेll

आक्रोशते भूमी बदला वातावरणl
वृक्ष लावूनी साधावे पर्यावरणll

सर्वांना विनंती🙏 आज ५ जून “विश्व पर्यावरण दिनानिमीत्त्याने प्रत्येकाने एक तरी 🌳झाड लावा. 🌳~🌳शुभम् भवतु:🌳~🌳
प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*