आज ४ जून संत कबीर जयंती – बडगुजर. इन

आज ४ जून संत कबीर जयंती
[८७४ वी जयंती]
संत कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. संत कबीर यांचा जन्म इ.स.११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर,कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात.महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते.संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली.त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते.संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो.संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत.त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले.एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे “कबीर के दोहे” युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील,असे वाटते._
कबीर जीवन परिचय:
खेमराज श्रीकृष्णदास यांनी प्रकाशित केलेल्या, हस्तलिखित “कबीर सागर” ग्रंथातील मजकूर: ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले.हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता.कर्मधर्म संयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे त्यांचे नाव निरू व नीमा होते तेथून जात असताना नीमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवरकडे गेली.तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली,आणि ते जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले.त्या मुलाचे नाम ठेवण्यासाठी निरूने मौलवीना बोलवले,तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडू पहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले.कबीरचा अर्थ होतो सर्वज्ञ/सबसे बडा.पण हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती.पण इच्छा नसतांनाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले,आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले.
कबीर जरी मुस्लिम कुटुंबात रहात होते तरी ते आदिरामाचे उपासक होते.संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता.कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते.ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण मगहर येथून ते सशरीर हा मृ्त्युलोक सोडून निजधामाला गेले.
“सकल जनम शिवपुरी गंवाया।
मरती बार मगहर उठि आया।”
कबीरांचाचा मृत्यू:इ.स. १५९८ साली झालाअसे मानले जाते.हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते.
भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.
कबीरांविषयी मराठीतील पुस्तके: आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर (संजय एस. शबर्वे)
कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद,मंगेश पाडगावकर)
कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ,प्रा. रतनलाल सोनग्रा)
कबीरवाणी(संत कबीरांच्या दोह्यांचा अर्थ,डॉ. नलिनी हर्षे)
कबीर ज्ञानामृत:संत कबीरांचे १००८ दोहे (स.ह. जोशी; गजानन बुक डेपो प्रकाशन)
कबीरायन (कादंबरी, डॉ. भारती सुदामे)
कहत कबीर (डॉ. मोहन विष्णू खडसे)कहत कबीर(डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक २-११-२०१५)
कहै कबीर दीवाना (ओशो)
कहै कबीर मैं पूरा पाया (ओशो)
भक्त कबीराच्या गोष्टी (शंकर पां.गुणाजी)
भक्तीत भिजला कबीर(मूळ लेखक-ओशो,मराठी अनुवाद-भारती पांडे)
भारतीय परंपरा आणि कबीर (पद्मजाराजे पटवर्धन)
भारतीय साहित्याचे निर्माते- कबीर (प्रभाकर माचवे)
माझे माझ्यापाशी काही नाही (मूळ लेखक-ओशो,मराठी अनुवाद-भारती पांडे)
मृत्यु अमृताचे द्वार (मूळ लेखक-ओशो,मराठी अनुवाद-मीना टाकळकर)
म्हणे कबीर दिवाणा (मूळ लेखक-ओशो,मराठी अनुवाद-भारती पांडे)
संत कबीर (मूळ लेखक प्रेमचंद ‘महेश’, मराठी अनुवाद-विद्याधर सदावर्ते)
संत कबीर-एक दृष्टा समाजसुधारक (डाॅ. मानसी विजय लाटकर)
संत कबीर यांची अमृतवाणी (गजानन बुक डेपो प्रकाशन)
संत कबीर संबंधित निवडक पीएच.डी प्रबंध .
आधुनिक संदर्भ: १.संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्यातील समाजप्रबोधनात्मक जाणिवांचा तुलनात्मक अभ्यास
२.संत कबीरांच्या दोह्यामधून प्रतिबिंबित होणाऱ्या मुल्याधिष्ठित अनोचारिक शिक्षणाचा अभ्यास.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
कबीर के १० बेहतरीन दोहे:देते हैं जिंदगी का असली👇ज्ञान:
१.जीवन की महिमा:
जीवन में मरना भला जो मरि जानै कोय |
मरना पहिले जो मरै,अजय अमर सो होय ||

अर्थ: जीते जी ही मरना अच्छा है,यदि कोई मरना जाने तो।मरने के पहले ही जो मर लेता है,वह अजर-अमर हो जाता है। शरीर रहते-रहते जिसके समस्त अहंकार समाप्त हो गए, वे वासना-विजयी ही जीवनमुक्त होते हैं।

२. मैं जानूँ मन मरि गया, मरि के हुआ भूत |
मूये पीछे उठि लगा,ऐसा मेरा पूत ||

अर्थ: भूलवश मैंने जाना था कि मेरा मन भर गया, परन्तु वह तो मरकर प्रेत हुआ। मरने के बाद भी उठकर मेरे पीछे लग पड़ा, ऐसा यह मेरा मन बालक की तरह है।

३. भक्त मरे क्या रोइये,जो अपने घर जाय |
रोइये साकट बपुरे, हाटों हाट बिकाय ||

अर्थ: जिसने अपने कल्याणरुपी अविनाशी घर को प्राप्त कर लिया,ऐसे संत भक्त के शरीर छोड़ने पर क्यों रोते हैं? बेचारे अभक्त – अज्ञानियों के मरने पर रोओ, जो मरकर चौरासी लाख योनियों के बाज़ार में बिकने जा रहे हैं।

४. मैं मेरा घर जालिया,लिया पलीता हाथ |
जो घर जारो आपना,चलो हमारे साथ ||

अर्थ: संसार-शरीर में जो मैं -मेरापन की अहंता-ममता हो रही है-ज्ञान की आग बत्ती हाथ में लेकर इस घर को जला डालो।अपना अहंकार-घर को जला डालता है।

६. शब्द विचारी जो चले,गुरुमुख होय निहाल |
काम क्रोध व्यापै नहीं,कबूँ न ग्रासै काल ||

अर्थ: गुरुमुख शब्दों का विचार कर जो आचरण करता है,वह कृतार्थ हो जाता है। उसको काम क्रोध नहीं सताते और वह कभी मन कल्पनाओं के मुख में नहीं पड़ता।

६. जब लग आश शरीर की,मिरतक हुआ न जाय |
काया माया मन तजै, चौड़े रहा बजाय ||

अर्थ: जब तक शरीर की आशा और आसक्ति है, तब तक कोई मन को मिटा नहीं सकता। इसलिए शरीर का मोह और मन की वासना को मिटाकर, सत्संग रूपी मैदान में विराजना चाहिए।

७. मन को मिरतक देखि के,मति माने विश्वास |
साधु तहाँ लौं भय करे,जौ लौं पिंजर साँस ||

अर्थ: मन को मृतक (शांत) देखकर यह विश्वास न करो कि वह अब धोखा नहीं देगा। असावधान होने पर वह फिर से चंचल हो सकता है इसलिए विवेकी संत मन में तब तक भय रखते हैं, जब तक शरीर में सांस चलती है।

८. कबीर मिरतक देखकर,मति धरो विश्वास |
कबहुँ जागै भूत है करे पिड़का नाश ||

अर्थ: ऐ साधक! मन को शांत देखकर निडर मत हो। अन्यथा वह तुम्हारे परमार्थ में मिलकर जाग्रत होगा और तुम्हें प्रपंच में डालकर पतित करेगा।

९. अजहुँ तेरा सब मिटै,जो जग मानै हार |
घर में झजरा होत है,सो घर डारो जार ||

अर्थ: आज भी तेरा संकट मिट सकता है यदि संसार से हार मानकर निरभिमानी हो जा। तुम्हारे अंधकाररूपी घर में को काम, क्रोधा आदि का झगड़ा हो रहा है, उसे ज्ञान की अग्नि से जला डालो।

१०. सत्संगति है सूप ज्यों,त्यागै फटकि असार |
कहैं कबीर गुरु नाम ले,परसै नहीं विकार ||

अर्थ: सत्संग सूप के ही समान है,वह फटक कर असार का त्याग कर देता है। तुम भी गुरु से ज्ञान लो, जिससे बुराइयां बाहर हो जाएंगी।
संत कबीर यांच्या ८७४ व्या जयंती निमित्ताने शतश: नमन-वंदन
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*