२ जून महत्वाच्या👇घटना – बडगुजर. इन

२ जून महत्वाच्या👇घटना

१८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.

१८९६: गुग्लियेमो मार्कोनीला रेडिओसाठी पेटंट बहाल.

१८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले,माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.

१९४६: राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

१९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१९५३: इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.

१९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली.कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९९९: भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.

२०००: लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.

२०१४: तेलंगण भारताचे २९ वे राज्य झाले.
👇जन्म/वाढ दिवस👇

१७३१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू:२२ मे १८०२)

१८४०: इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म.(मृत्यू: ११ जानेवारी १९२८)

१९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.

१९३०: अमेरिकन अंतराळवीर पीट कॉनराड यांचा जन्म.

१९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.

१९५५: इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.

१९५५: चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.

१९६३: अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१२)

१९६५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मार्क वॉ यांचा जन्म.

१९६५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू स्टीव्ह वॉ यांचा जन्म.

१९७४: अमेरिकन बुद्धीबळपटू गाटा काम्स्की यांचा जन्म.

👇मृत्यू/पुण्यतिथी👇

१८८२: इटलीचा क्रांतिकारी ज्युसेप्पे गॅरिबाल्डी यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८०७)

१९७५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)

१९८८: भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९२४)

१९९०: ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९०८)

१९९२: मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १९३४)

२०१४: भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन.(जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*