आज-२-जून दिनविशेषl
सोहळा शिवराज्याभिषेकll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दुर्गराज रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २ जून रोजी तिथीप्रमाणे तर ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे.
तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून आज गणेश पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
राज दरबारमध्ये ३५० वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यावेळी असलेल्या दरबाराचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त सध्या रायगडावर दाखल झालेत.यंदा शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चांदीची पालखी वापरली जाणार आहे.दरम्यान आज या पालखीचं पूजन करण्यात आलंय.!
तिथीप्रमाणे होणाऱ्या रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन असं असेल👇
१ जून: गडदेवता शिर्काई पूजन,छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव,गंगासागर पूजन,संध्याकाळी पारंपरिक गोंधळ,रात्री सांस्कृतिक कार्यक्रम
जून:सकाळी ७ वाजता ध्वजारोहन सोहळा
सकाळी ९ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा.
सकाळी १०.३०वाजता: श्री शिवसन्मान सोहळा*
सकाळी ११ वाजता शिवपालखी सोहळा.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच श्रीमंत शाहूराजे छत्रपती,छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
तिथीप्रमाणे २ जूनला पहाटेपासूनच या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
मुख्य गोष्ट म्हणजे चांदीच्या पालखीचे आज पूजन करण्यात आले.तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील होन देखील यावेळी राज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान वापरले जाणार आहेत.गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत.
दुर्गराज रायगडवर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू,शिवभक्त रायगडवर जमण्यास सुरुवात.
तारखेप्रमाणे ६ जून रोजी सोहळा.👇
६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार असून संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे.२००७ पासून सुरू झालेल्या या सोहळ्याला आता व्यापक स्वरुप प्राप्त झालं असून ६ जून रोजी रायगडवर दोन ते अडीच लाख शिवभक्त जमा होतात.
मुंबई गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी:
मुंबई गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागानं हे आदेश काढलेत.बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून या आदेशाची अमलबजावणी करण्यात येणार आहे.१,२ जून आणि ५,६ जून या दिवशी अवजड वाहनांना बंदी असेल.१६ टन आणि त्यापेक्षा जास्त वजन क्षमतेच्या जड, अवजड वाहनं,ट्रक,मल्टी एक्सल ट्रेलर यांना वाहतूकीसाठी बंदी घातली आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे.तर राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांची वाहतूक कोंडीने गैरसोय होऊ नये म्हणून अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेतलाय.!
जाणता राजा शिवाजी राजाl
एकच राजा शिवाजी राजाll
ll🚩जय🙏शिवराय🚩ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा
शिवसुर्य छत्रपती शिवाजी महाराज👑
राजाधिराज छत्रपती शिवराय
दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती
सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
श्रीमंतयोगी महाराजाधिराज…
छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्तांनं
शिवजनांना….. शिवकन्यांना…..
शिवमावळयांना…..
शिवभक्तांना…..
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अठरा पगड जातीच्या सर्व शिवप्रेमी रयतेस मंगलमय
शिवमय शिवशुभेच्छा…!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
llजय जिजाऊ•जय शिवरायll
🇮🇳llजय हिंद•जय महाराष्ट्रll⛳
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


Leave a Reply