२९ मे महत्वाच्या👇घटना – बडगुजर. इन

〰️🚩दिन विशेष🚩〰️
२९ मे महत्वाच्या👇घटना

१७२७: पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.

१८४८: विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.

१९१४: ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.

१९१९: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.

१९५३: एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.
🎂२९ मे🎂जन्म🎂

१९०६: भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६४)

१९१४: एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९८६)

१९१७: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

१९२९: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म.
२९ मे मृत्यू

१८१४: नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन डी बीअर्नार्नास यांचे निधन. (जन्म: २३ जून १७६३)

१८२९: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १७७८)

१८९२: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ – तेहरान, इराण)

१९७२: अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)

१९७७: भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चटर्जी यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)

१९८७: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १९०२)

२००७: संगीतकार स्‍नेहल भाटकर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९१९)

२०१०: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*