आप्पासाहेब यु.एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाची गरुड झेप – श्री. हरीश पवार, पिंप्री

पारोळा : नुकत्याच झालेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पुन्हा एकदा श्री बालाजी विद्या प्रबोधीनी मंडळ संचलित ,आप्पासाहेब यू. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली असून विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 87 पैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
तालुक्यातून प्रथम क्रमांक येण्याच्या मान विद्यालयातील चव्हाण वैष्णवी सूर्यकांत व साळुंखे मयंक प्रशांत यांना 85.33% मिळवून मिळवला तसेच विद्यालयातून द्वितीय गुजराती श्रुती निलेश 85.17%, तृतीय क्रमांक बडगुजर मंथन सचिन 84.67%, विद्यार्थीतील चौथा क्रमांक कोडके शंतनू संजय 84.50%, व विद्यालयातील पाचवा क्रमांक दाणेज शंतनू अजय 83.33% गुण मिळाले तसेच विद्यालयातील एकूण 87 विद्यार्थी एच एस सी फेब्रुवारी 2023 च्या परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकूण 19 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले, तसेच प्रथम श्रेणीत एकूण 43 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयातील शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे विद्यालयाची सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु एच. करोडपती सर ,सचिव डॉ. सचिन उमेश बडगुजर तसेच संचालक मंडळ, व विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय बडगुजर सर यांनी अभिनंदन केले सर्व गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*