२४ मे जागतिक स्किझोफ्रेनिया(मानसिक आजार)दिन.! – बडगुजर.इन

आज २४ मे जागतिक स्किझोफ्रेनिया(मानसिक आजार)दिन.!
२४ मे रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस साजरा केला जातो.स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर आजाराची समाजात जाणीव निर्माण व्हावी व सगळे रुग्ण त्याचा व्यवस्थित ईलाज करावा हा त्यामागील हेतू.नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थच्या नुसार भारतातील स्किझोफ्रेनियाचे प्रघात १.४% जनतेवर आहे.ह्या आजारावर उपचार करण्यास भीतीपोटी लोकं धजावत नाहीत.SCARF (२००६) या संस्थेने केलेल्या संशोधनात आढळले की १०.७ वर्षे कालावधी बरीच पेशंट ही विना उपचार राहतात.ही फार मोठी शोकांतिका आहे. व्यवस्थित उपचार झाल्यावरही फक्त ८ % पेशंटच ह्यातून पूर्णपणे बाहेर येतात व त्यांना परत उपचाराची गरज पडत नाही.
स्किझोफ्रेनिया: हा आजार आधुनिक जीवनशैलीमुळे,प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली आहे.या ताणामुळेच आपली चिडचिड वाढते,यामुळे इतर लोकांसमोर आपला चिडचिडा(चिडखोर) स्वभावाची “इमेज” तयार होते.काही लोक कधी कधी असं काहीही नसताना या त्रासाला सामोरे जाताना दिसतात.जसं कोणत्याही गोष्टीला घाबरणं किंवा कशाचंही भास होणं,नको त्या कारणाने चिडचिड होणं,आणि याच मानसिक आजाराला वैज्ञानिक भाषेत स्किझोफ्रेनिया म्हटलं जातं.
२४ मे १९८६ पासून प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यात स्किझोफ्रेनिया या आजारा विषयी जनजागृती केली जाते.
स्किझोफ्रेनियाची लक्षणं:
स्किझोफ्रेनिया एक मानसिक आजार आहे, हा रोग व्यक्तीच्या विचार आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचते, आणि याच कारणामुळे रुग्णाच्या नातेसंबंधात खंड पडताना दिसत आहे. स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्ती अगदी साधारण जबाबदाऱ्या हाताळण्यास असमर्थ ठरते. स्किझोफ्रेनिया पीडित बहुतांश रुग्ण २० ते २४ वर्षांचे असतात.
भावनिक समस्या:
भावनिकदृष्ट्या पीडित असलेल्या लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला असतो.आपल्या आजूबाजूचा परिसर,लोक आणि वातावरणाशी त्यांचा काहीही संबंध नसतो,अशी व्यक्ती आपल्याच जगात हरवलेली असते.यामुळेच अशा व्यक्ती एकटेपणाचा शिकार बनतात. परिणामी त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी त्यांना उदासीन वाटतात. अशा रुग्णांना कोणत्याही इतर व्यक्तींशी बोलणं किंवा मैत्री करणे आवडत नाही.
भ्रम//भास: भ्रम म्हणजे ज्या गोष्टी त्या ठिकाणी नाहीत तरी त्या व्यक्तीला त्या ठराविक गोष्टीचं भास होणं. स्किझोफ्रेनियाने पीडित व्यक्तीला कोणत्याही गोष्टींचा, सुगंधाचा आणि आवाजाचा भास होतो. परिणामी अशा व्यक्तींना भीती वाटू लागते. पण इतर लोकांना स्किझोफ्रेनिया पीडित लोकांचं असं वागणं पटत नाही. परिणामी इतर लोक त्या व्यक्तीबद्दल वेगवेगळे तर्क लावताना दिसतात.
अस्वस्थ विचार प्रक्रिया: या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे विचार आणि समजून घेण्याची क्षमता खूप कमी असते. म्हणजे जर ते एखाद्या पदार्थाबद्दल बोलत असताना ते रंगाबद्दल चर्चा करतील.असे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात. कधी कधी ते एकट्यामध्ये विनाकारण बडबडत असतात.
वर्तणुकीची लक्षणं:
स्किझोफ्रेनियाने पीडित असलेले रुग्ण एकट्यामध्येच राहणे पसंत करतात.परिणामी त्यांना भीती, चिडचिडेपणा या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागतं.हे रुग्ण एकेकट्यामध्ये हसत देखील बसतात.
खास वैशिष्ठ्य: मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला समाजात एक वेगळी वागणूक दिली जाते. अशा व्यक्तींबद्दल कोणतेही निकष काढले जातात जसं की, अशा रुग्णांना कायम मेंटल ट्रीटमेंट घ्यावी लागेल पासून मानसिकदृष्ट्या लोकांचं कधी लग्नच होऊ शकणार नाही इथपर्यंत, पण मानसिकदृष्ट्या आजारी असणं हे त्या व्यक्तीचा दोष नाही, परंतु समाज आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्या रुग्णाला मनोबल देण्याचा प्रयत्न केल्यास तो त्या आजारापासून मुक्त होण्यासाठी प्रबळ बनेल आणि जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचं हेच खास वैशिष्ठ्य
ठरेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*