२१ मे – चिपको आंदोलनाचे प्रणेते कै. सुंदरलाल बहुगुणायांची पुण्यतिथी – बडगुजर. इन

आज २१ मे – चिपको आंदोलनाचे प्रणेते कै. सुंदरलाल बहुगुणायांची पुण्यतिथी
[९ जानेवारी १९२७-२१ मे २०२१.]
सुंदरलाल बहुगुणा हे एक प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी असून चिपको आंदोलनाचे प्रणेते होते.महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून,ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती. त्या विरोधात चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली.

टेहरीसाठी उपोषण
संपादन करा
टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली.धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.

भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम आजही (२०१७ साली) चालू आहे.
‘झाडांआधी आम्हाला कापा’ असे म्हणत झाडाला मिठी मारायला शिकवणारा अवलिया:सुंदरलाल बहुगुणा:

“आपण आपल्या पृथ्वीवर अत्याचार करत आहोत, निसर्गावर अत्याचार करत आहोत. आपण निसर्गाचे खाटिक झालोत”,एका मुलाखतीत सुंदरलाल बहुगुणा सांगत होते.
बहुगुणा यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी कोव्हिड-19 आजाराने निधन झालं. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी झाडांना मिठी मारायला शिकवणारा अवलिया, म्हणून संपूर्ण जग त्यांना ओळखतं.१९७०च्या दशकात उत्तर भारतात सुरू झालेल्या चिपको आंदोलनातले ते महत्त्वाचे नेते होते. ‘चिपको’ म्हणजे ‘मिठी मारणे’.
सुंदरलाल बहुगुणा आणि त्यांचे सहकारी चांदी प्रसाद भट्ट यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो स्त्री आणि पुरुषांनी सर्व बाजूंनी साखळी करत झाडांना मिठी मारून वृक्षतोडीपासून वाचवलं आहे. ‘झाडांआधी आम्हाला कापा’, असा तो संदेश होता.

‘आई तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, झाडांच्या रुपात नेहमी सोबत असशील’
किमान १० झाडं लावली तरच मिळणार बंदुकीचा परवाना
झाडांना असा सहन करावा लागतो तुमच्या-आमच्या शिक्षणाचा त्रास
या आंदोलनाने जगातील सर्वांत उंच पर्वतावर पर्यावरणाच्या संकटामुळे जो विनाश ओढावत होता, त्याकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं.

१९७० साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराने स्थानिक गावकऱ्यांचे डोळे उघडले. या महापुरामुळेच “जंगलतोड, भूस्खलन आणि पूर यांच्यातला संबंध स्पष्ट झाल्याचं” इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी चिपको आंदोलनाचं वर्णन करताना म्हटलं होतं.

या महापुरानंतर तीन वर्षांनी बहुगुणा आणि सहकारी कार्यकर्त्यांनी झाडांना मिठी मारण्याचं आंदोलन सुरू केलं. निसर्ग संवर्धनासाठी तरुणांनी बोट कापून शपथा घेतल्या.लवकरच हिमालयाच्या कुशीतल्या गावांमधल्या स्त्रियांनीही या आंदोलनात उडी घेतली. त्या झाडांना मिठी मारायच्या, झाडांना राखी बांधायच्या. इतकंच नाही तर वृक्षतोड करण्यासाठी आलेल्यांची हत्यारंही पळवायच्या.
चिपको 👇आंदोलन:
हिमालयाच्या कुशीतच जन्माला आलेले बहुगुणा यांनी सर्व धागे बरोबर जुळवले होते. जंगलतोडीमुळे सुपीक जमिनीची धूप झाली आणि त्यामुळे गावातल्या तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी शहराची वाट धरावी लागली,असं बहुगुणा सांगत.गावातली पुरुष मंडळी शहरात गेल्याने गावात मागे राहिलेल्या महिलांच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आली. शेतीसोबतच गुरांसाठी चारा आणणे, जाळणासाठी लाकूड तोडून आणणे, नदी-विहिरींवरून पाणी भरून आणणे अशी सगळी कामं स्त्रिया करू लागल्या आणि म्हणूनच महिलांच्या अधिकारांसाठीच्या लढ्यात चिपको आंदोलनही एक मैलाचा दगड ठरला.

वर्षागणिक बहुगुणा यांच्या आंदोलनाला बळ मिळत गेलं.स्त्रिया आणि महाविद्यालयीन तरुण त्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले. ते शांततामय मार्गाने निदर्शनं करत, वृक्षतोड करायला येणाऱ्यांसमोर झाडांना मिठ्या मारत,उपोषण करत.

अखेर या सर्वांचा परिणाम झाला.१९८१साली केलेल्या उपोषणानंतर सरकारने उत्तराखंडमध्ये व्यावसायिक वापरासाठी झाडांची कत्तल करण्यावर १५ वर्षांसाठी बंदी आणली. दोन वर्षांनंतर हिमालयात होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ४ हजार किमीची पदयात्रा केली.

काश्मीर आणि कोहिमाच्या या यात्रेनंतर त्यांनी १९९२ साली भारतातील सर्वांत उंच धरण असलेल्या टिहरी धरणाच्या बांधकामाविरोधातही आंदोलन केलं. या धरणाविरोधात त्यांनी मुंडन करत उपोषण केलं. या धरणात इतर शेकडो लोकांप्रमाणेच बहुगुणा यांचंही वडिलोपार्जित घरं गेलं होतं.

जंगलतोडीसाठी वन अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांच्यातल्या संगनमताविषयी ते कायम उघडपणे बोलायचे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बहुगुणा यांच्या आंदोलनाविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या, “खरं सांगायचं तर मला त्यांच्या आंदोलनामागचा नेमका उद्देश काय आहे, ते माहिती नाही. पण, त्यांना जर खरंच वृक्षतोड थांबवायची असेल तर मी त्यांच्यासोबत आहे.”

काळ पुढे सरकला असला तरी बहुगुणा यांच्या आंदोलनातून आजही प्रेरणा मिळते.२०१७ साली मुंबई मेट्रोसाठी जवळपास ३००० झाडांची कत्तल करण्यात येणार होती. पण, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी झाडांना मिठी मारून ती वृक्षतोड थांबवली होती.

साधी राहाणी आणि म. गांधींच्या तत्त्वांवर चालणारे बहुगुणा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. एका छोट्या आश्रमात ते राहत. हिंसेला त्यांचा तीव्र विरोध होता आणि राजकारणापासून त्यांनी स्वतःला कायम दूर ठेवलं होतं. परदेशातून व्यापार करण्याऐवजी आत्म-निर्भरतेवर त्यांचा अधिक विश्वास होता. ते भौतिकवादाचा विरोध करायचे.

मानवी विष्ठेपासून बायोगॅस निर्मिती, सौर आणि पवन ऊर्जा, जलविद्युत निर्मिती याद्वारे भारत ऊर्जेबाबत ‘अहिंसक आणि शाश्वत’ मार्गाने स्वयंपूर्ण होऊ शकतो, असा विश्वास त्यांना होता. कमी ऊर्जेवर चालणारी यंत्र विकसित करावी, असा सल्लाही ते देत.

आज उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टिहरीमध्ये १९२७ साली सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म झाला. सालवृक्ष, ओकवृक्ष यांनी वेढलेल्या झाडा-झुडुपांनी समृद्ध अशा निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं बालपण गेलं.

बीबीसीचे माजी सहकारी असलेले अमित बरुहा १९७० साली शाळेच्या सहलीच्या निमित्ताने बहुगुणा यांना भेटले होते आणि त्यांचं काम प्रत्यक्ष बघितलं होतं.

त्या सहलीच्या आठवणी सांगताना तिथे वादविवाद किंवा संघर्ष करणारा नाही तर एक मितभाषी, सौम्य आणि सहृदयी माणसाचं दर्शन झाल्याचं ते सांगतात. अमाप वृक्षतोडीमुळे हिमालयातले झरे कोरडे पडत चालल्याचं आणिक सर्वप्रथम निदर्शनास आणून दिल्याचं बरुहा म्हणतात.

हिमालयातून वाहणारे झरे कोरडेठाक पडल्याचं आणि दूरवरून पाणी भरुन आणणारे स्थानिक आपल्याला दिसल्याचं बरुहा सांगतात. स्वतःच्याच अनुभवातूनच बहुगुणा यांना आंदोलनाची प्रेरणा मिळाल्याचं बरुहा सांगतात. पर्यावरण रक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारा ‘धरणीपुत्र’ म्हणून सुंदरलाल बहुगुणा कायम स्मरणात राहतील.


➰➰➰➰➰➰➰
भारतातील आद्य पर्यावरणवादी
चिपको आंदोलनाची लोकप्रियता वाढवण्यास जबाबदार असलेले सुंदरलाल बहुगुणा यांचे कोविड-१९ संसर्गातून उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे २१ मे २०२१ रोजी निधन झाले. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलांच्या संरक्षणासाठी त्यांनी १९७० पासून चिपको आंदोलनाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर १९८० ते २००४ या कालावधीत ते टेहरी धरणाविरुद्ध सतत कार्यरत राहिले. भारतातील आद्य पर्यावरणवादी व्यक्तींपैकी ते एक होते. अतिप्रचंड धरणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याकडे त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.

९ जानेवारी १९२७ रोजी उत्तराखंडातील टेहरी येथील मरोडा गावात जन्मलेल्या सुंदरलाल बहुगुणा यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात देखील भाग घेतला होता. गांधीवादी विचारांनी प्रेरित असलेल्या बहुगुणांनी चार हजार ७०० किलोमीटर अंतर पायी पार करून महाप्रचंड प्रकल्पांमुळे होणारे हिमालयातील दऱ्याखोऱ्या-जंगलांचे नुकसान किती भयानक आहे, याचे वास्तव निदर्शनास आणले. हिमालयाची परिसंस्था अतिशय नाजूक असते. ही ढासळली तर सामाजिक परिणामदेखील भयावह होतात, याची कल्पना त्यांनी आधीच दिली होती. आता मात्र विकासाच्या रेटय़ात या भागात झालेल्या मानवनिर्मित रचनांमुळे, गेल्या काही दशकांतील हवामान बदलाच्या संकटांमुळे स्थानिकांची आणि पर्यटकांची अपरिमित हानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘इकॉलॉजी इज पर्मनन्ट इकॉनॉमी’ हे त्यांचे अतिशय महत्त्वाचे घोषवाक्य परिसंस्थेचा अर्थशास्त्राशी असलेला कायमस्वरूपी संबंध दर्शवते. त्यांनी १९८१ ते ८३ या कालावधीत हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांत व गावागावांत हिंडून जनजागृती केली. याच काळात कार्यरत असलेल्या गौरादेवी यांच्याबरोबरदेखील त्यांनी चिपको आंदोलनाचा प्रसार केला. त्यांच्या समाजकार्याचा परीघ केवळ पर्यावरणापुरता सीमित न राहता डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांची स्थिती सुधारणे, विशेषत: महिलांना सक्षम करणे आणि जातीवाद मिटवण्यापर्यंत विस्तारला होता.

त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन कर्नाटकातील पांडुरंग हेगडे यांनी १९८३ मध्ये ‘अ‍ॅप्पिको चळवळ’ उभारली. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या क्षेत्राच्या रक्षणासाठी त्यांच्यासोबत बहुगुणा यांनीदेखील दक्षिण भारत पिंजून काढला. ‘बेढती’ येथे उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला या साऱ्यांचा कडाडून विरोध होता.

बहुगुणा यांना १९८१ मध्ये पद्मश्री, १९८७ मध्ये ‘राइट लाइव्हलीहूड पुरस्कार’ आणि २००९ मध्ये पद्मभूषण हा बहुमान देऊन त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला.बहुगुणांच्या कार्यामुळेच चिपको आंदोलनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली..डॉ.नंदिनी वि.देशमुख.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*