श्री. राजेंद्रकुमार रघुनाथ कोतवाल हे विवाह समुपदेशक राजपत्रित अधिकारी वर्ग १ यापदावरून सेवा निवृत्त – श्री. किशोर बडगुजर, सुरत

बोदवड जिल्हा जळगाव येथील श्री. राजेंद्रकुमार रघुनाथ कोतवाल हे विवाह समुपदेशक राजपत्रित अधिकारी वर्ग १ यापदावरून दि. ३१-०५-२०२३ रोजी सेवा निवृत्त झाले. यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे बोदवड या ग्रामीण भागातच झाले. पुणे विद्यापीठातून प्रताप कॉलेज अमळनेर जि. जळगाव येथून पदवी घेतली. व्यवसायीक समाज कार्य या विषयात पदव्युत्तर पदवी ही शिक्षण कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विस पुणे येथे झाले. हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर डिपारमेंट मध्ये संशोधन प्रकल्पात सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ अँटीपोलॉजी यनिव्हसीटी ऑफ पुणे यांच्या तर्फे केल्या गेलेल्या संशोधन प्रकल्पात सहभागी. पश्चिम महाराष्ट्र व चंद्रपूर या विभागात आरोग्य विषयक पाहणीत काम केले. कौटुंबिक न्यायालय मुंबई येथे २००४ मध्ये विवाह समुपदेशन, राजपत्रित वर्ग १ म्हणून नियुक्ती त्यानंतर नागपूर कौटुंबिक न्यायालयात कार्यरत.
महाराष्ट्र राज्य विवाह समुपदेशक संघटनेत विविध पदावर व कार्यकारणी सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच कौटुंबिक न्यायालय कर्मचाऱ्यांची पतसंस्था नागपूर येथे अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहे दिनांक ३१.०५.२०२३ रोजी सेवानिवृत्त झाले.श्री. राजेंद्रकुमार रघुनाथ कोतवाल यांनाअखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*