⚓आज १५ मे-जागतिक👇कुटुंब दिन👇
जेव्हां संपूर्ण जग आपल्याविरुद्ध उभे असते, तेव्हां फक्त कुटुंबच आपल्या मागे ठाम उभे असते.अशा या कुटुंबाला समर्पित म्हणून,दरवर्षी १५ मे रोजी
‘आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस’ साजरा केला जातो.
१९९३ मध्ये,संयुक्त राष्ट्राचा ठरावाद्वारे दरवर्षी १५ मे हा कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
कुटुंब अजूनही समाजातील एक मूलभूत घटक मानला जातो.युवकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती,संयुक्त कुटूंबाचे महत्त्व आणि आयुष्यात कुटुंबाची गरज याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात हा दिवस साजरा केला जातो.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जागतिक कुटुंब दिवसाला विशेष महत्त्व आले आहे.
आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धत दिवसें दिवस वाढत आहे.
चला तर आज जागतिक कुटुंबदिवसाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी आवश्यक गोष्टी जाणून घेऊयात…!
↕️
⚓सध्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या उपकरणांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यापून टाकला आहे. एकतर आपण फार कमी वेळ घरात असतो. त्यात या उपकरणांमुळे आपण घरातील व्यक्तींना वेळ देत नाही.त्यामुळे घरात आल्यावर मोबाईल, कॉम्प्युटर,टीव्ही ही उपकरणे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
⚓तुम्हाला आपले कुटुंब एकत्रित हवे असेल तर सर्वांना आवडेल,रुचेल असा एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा.यामध्ये तुम्ही एकत्रितपणे सायकलिंग करु शकता,एकत्रितपणे एखादे पुस्तक वाचू शकता,सगळ्यांना आवडतील अशी गाणी एकत्रितपणे ऐकू शकता.
⚓घरातील सर्वांनी किमान सकाळचा नाष्ता किंवा रात्रीचे जेवण एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करावा.त्यामुळे दिवसभरातील सर्वांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल माहिती होते.
⚓महिन्यातील एक दिवस सर्वांच्या वेळा बघून अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसाच्या आऊटींगला जाण्याचा प्रयत्न करा.यामुळे तुमचा एकमेकांमधील संवाद वाढण्यास मदत होईल.
⚓मोकळ्या वेळात तुमच्या मुलांशी गप्पा मारा.त्यांना त्यांच्या शाळेतील, कॉलेज मधील गोष्टी,मित्रमैत्रीणीं विषयीच्या गोष्टी विचारा.त्यानंतर तुमच्या लहानपणीच्या गोष्टीही शेअर करा.त्यामुळे मुलांना वेगळ्या गोष्टींची माहिती होईल.
या दिवशी जगातील सर्व कुटुंबीय आनंदी,सुख-समृद्धी व एकत्र कुटुंब पद्धतीत राहावी,एव्हढीच या दिवशी अपेक्षा..!
आज जागितक कुटुंब दिनानिमित्त कोविड २९ पासून आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी निर्धार करा,
कुटुंबापेक्षा मोठं,
धन कोणतंच नाही!
वडिलांपेक्षा चांगला,
सल्लागार कोणीही नाही!
आईच्या सावलीपेक्षा मोठं, जग कोणतंच नाही!!
भावापेक्षा उत्तम,
भागिदार कोणीही नाही!
बहिणीपेक्षा जवळची,
शुभचिंतक कोणीही नाही!!
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं,
दुसरं जग व जीवन
असूच शकत नाही.!_
हे संपूर्ण विश्व परमेश्वराचे एक कुटुंब आहे,आणि या वैश्विक कुटुंबासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी जी वैश्विक अखिल प्राणीमात्रां साठी प्रार्थना केली आहे.तिचे देखील आज आपण स्मरण, मनन,चिंतन,करू या.!
आतां विश्वात्मके देवे,
येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे,
पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो,
मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो,
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो,
प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी,
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी,
भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव,
पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन,
मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन,
सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी,
पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं,
अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये,
विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये,
होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो,हा होईल दानपसावो,येणे वरे ज्ञानदेवो,सुखिया झाला ||
आज जागतिक कुटूंब दिनानिमित्तांने आपले गृप सदस्य म्हणजे एक कुटूंबच आहे!सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
🌹🪷🪷🪷🪷🪷🌹
Leave a Reply