आज १४ मे-मार्क झुकरबर्ग चा जन्म दिवस.!
जगातली सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) चे संस्थापक मार्क इलियट झुकरबर्ग (Mark Zuckerberg झुकीबाबा) चा जन्म १४ मे १९८४ साली झाला. झुकरबर्गचा जन्म न्यूयॉर्क येथील व्हाइट प्लेन्स येथे झाला. त्याचे वडील के.एम. केम्नर मानसोपचार तज्ञ तर आई एडवर्ड झुकरबर्ग ही डेंटिस्ट आहे. आज फेसबुकने अख्ख्या जगाला वेड लावलं आहे. सोशल मीडियाच्या महत्वाच्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही प्लॅटफॉर्मवर झुकरबर्गचीच मालकी आहे.
आज याच मार्कमुळे आपण घरांमध्ये बसून एकमेकांशी कनेक्टेड आहोत.आज आपण मार्कच्या वाढदिवसानिमित्त त्याचा संपूर्ण प्रवास आणि त्याच्याविषयी माहित नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.!
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या उक्तीप्रमाणे कॉम्पुटर गेम खेळण्याच्या वयात मार्क गेम्स बनवण्यात मग्न असायचा.अवघ्या १२ वर्षांचा असताना मार्कने वडिलांच्या ऑफिससाठी मेसेजिंग प्रोग्राम तसेच शाळेच्या दिवसात एक म्युझिक अॅप डेव्हलप केले होते.मार्कचे कॉम्प्युटर प्रेम कॉलेजमध्येही कायम राहिले.
मार्कचा वेग पाहता त्याला एओएल व मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी नोकरीच्या ऑफर देऊ केल्या मात्र त्याने हॉवर्डला जाण्याचा निर्णय घेतला.हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना मार्कला एक भन्नाट कल्पना सुचली,त्याने कॉलेजच्या मुलांना जोडण्यासाठी एक वेबसाईट तयार केली. संपूर्ण लोक एकत्र येतील अशी एक वेबसाईट तयार करण्याचा मार्कने विचार केला. पुढे जाऊन हाच विचार फेसबुकमध्ये परावर्तित झाला.
सर्वात प्रथम ४ फेब्रूवारी २००४ मध्ये फेसबुक लाँच झाले.तेव्हा हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सॉफ्टवेअर (वेबसाईट) असणारे फेसबुक मेंबरशिप लिमिटेड होते.
आता हळू-हळू यासाठी पैशांची गरज जाणवायला लागली.मात्र आर्थिक समस्येपुढे मार्कने हार मानली नाही. मग त्याने १०० कुटुंबाकडून ८५००० डॉलर कर्ज म्हणून घेतले. पीटर थील यांनी फेसबुकमध्ये ५ लाख डॉलर गुंतवले.
मग मार्कची वेबसाईट अपडेट व्हायला लागली. त्यातून शहरातील इतर कॉलेजांना देखील जोडण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालेले हे सॉफ्टवेअर पुढे जाऊन जगावर आपला प्रभाव टाकू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र मार्क आणि त्यांच्या मित्रांच्या प्रयत्नांना घवघवीत यश मिळाले.
आता फेसबुकची लोकप्रियता वाढायला लागली होती. हाच विचार करून मार्कने भारतासारख्या मोठ्या मार्केटमध्ये उतरायचे ठरविले. मात्र त्यावेळी भारतात ‘ऑर्कूट’ ची एक वेगळीच हवा होती. ‘ऑर्कूट’ ला टक्कर द्यायचा कुणी विचार करेल असे वाटत नव्हते.
मात्र सर्व बंधनांना झुगारून मार्के स्वतःच एक वेगळा मार्ग निवडला आणि तो यशस्वी करून दाखविला. फेसबुकचे यश पाहून तेव्हा याहूसह ११ कंपन्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्क यांनी सर्वच ऑफर झुगारल्या.मार्क म्हणतो, प्रश्न हा नाही की आपण लोकांच्या बाबत काय जाणू इच्छितो,प्रश्न हा आहे की लोक आपल्याबद्दल काय सांगू इच्छितात.
झुकरबर्ग संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी…
झुकरबर्ग २३ वर्षाच्या वयात अब्जाधीश झाला होता. त्याला लहानपणापासूनच कम्प्यूटरची आवड होती. त्याच्या वडिलांनी त्याला C++ ची पुस्तकं भेट दिली होती. य़ा पुस्तकांनी त्याचं जीवन बदलून गेलं. लहानपणी मार्क ने एक मॅसेजिंग प्रोग्राम बनवला होता ज्याचा वापर त्याचे वडील आपल्या दवाखान्यात करायचे.
१७ वर्षाचा असताना झुकरबर्गनं एक सिनेप्स मीडिया प्लेअर बनवला होता.
हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली.
फेसबुकचं हेड ऑफिस अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे.
२०१० मध्ये टाईम मासिकाने त्याला “पर्सन ऑफ द इयर” च्या पुरस्कार दिला होता. जगातील १०० श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये झुकरबर्ग यांचा समावेश केला आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये फॉरबसच्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत झुकेरबर्ग १० व्या स्थानावर होता.
२०१८ मध्ये भागीदारांनी सीईओ झुकरबर्गला चेअरमन पदावरुन हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अनेक हाय प्रोफाईल घोटाळे समोर आल्यानंतर झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली होती.
इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंप्ट्रोलर स्कॉट स्ट्रिंगरने एकत्रितपणे हा प्रस्ताव ठेवला आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव २०१७ मध्ये धुडकावण्यात आला होता. झुकरबर्गकडे फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स आहेत.
विशेष आणि माहित नसलेल्या बाबी..!
● मार्कने इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपसारख्या कंपनीचे अधिग्रहण केले.
● मार्कने 2013 मध्ये एक बिलियन डॉलर्स चॅरिटीला दान केले होते.
● मार्क नेहमी सामान्य ग्रे टी शर्ट किंवा हुड व जीन्समध्ये दिसून येतात.
● फेसबुकचा लोगो निळ्या रंगाचा आहे कारण मार्कला लाल-हिरव्या रंगाचा रंगांधळेपणा आहे.
● फेसबुकवर मार्क झुकेरबर्गला कुणीही ब्लॉक करू शकत नाही.
● फेसबुकच्या आकडेवारीनुसार,प्रत्येक ५ सेंकदाला ५ नवीन लोक फेसबुक अकाउंट बनवतात.




Leave a Reply