“आज ८ मे-जागतिक मातृदिन”
“आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी”
“आई नाही तर जगात काही नाही”
“आई म्हणजे आ त्मा ई श्वराचा”
आई ही आई असते ती लेकरावर प्रेमाचा वर्षाव ची घाई करते.
“आई” संबंधी काहीही/कितीही/कसेही लिहले तर ते अपूर्णच राहणार.
माझ्या मनाला भावलेल्या तीन कविता सर्व काही👇सांगून जातील•
आई म्हणजे पृथ्वीवरील सर्व काहीl
सदा कायमस्वरूपी हृदयात राहीll
👇म्हणून👇
माझी आई कधीच न जाईl
जाईच्या फुलाप्रमाणे निर्मळ बाईll
स्वतःच स्वतःचे मन खाईl
सदा मुलामुलींचे गुणगान गाईll
कधी कशाची करत नसे घाईl
सदा भजत असे साई अन् साईll
आप्तजण सारे म्हणत नूबाईl
माहेरचे प्रेमाने म्हणत नूताईll
अशी आमची प्रेम स्वरूप आईl
आम्हा सर्वांची वात्सल्य सिंधू यमुनाईll
जगातील सर्वात मौल्यवान दोन शब्द “आई”l
पण
आमच्यासाठी मात्र लाखमोलाचे चार शब्द “यमुनाई”ll
यमुनाईचे चरणी शतशः नमन
🙏🙏🙏
प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे•
•~———————-~•
आई हा आपल्या जन्मापासून सुरू होणारा विषय आहे. आपला जन्मच मुळी ज्या आईच्या उदरातून झाला तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. ते व्यक्त करायला जगातील कोणत्याही भाषेतील शब्द अपुरे आहेत,पण तरीही वेड्या मनाचा एक वेडा प्रयत्न..! “स्पंदन– मनातील लहरींचे,टिपण्याचा”
👇
|| स्पर्श मायेचा ||
स्पर्श तो मायेचा
केवळ आईचा
त्याला नाही भय
जगी कुठे …..१
स्पर्श तो मायेचा
केवळ हळवा
दुःखात हवासा
एक धीर….२
स्पर्श तो मायेचा
एक हळुवार
जिव्हारीचे घाव
पुसतसे ….३
स्पर्श तो मायेचा
शीतल फुंकर
आग जीवनाची
विझविते ….४
स्पर्श तो मायेचा
मनीचे गुंजन
सुख व दुःखात
एकजीव …..५
स्पर्श तो मायेचा
एक उबदार
मनी हळुवार
सुखावतो …..६
स्पर्श तो मायेचा
सुखाची सावली
दुःखाची ती गोळी
गिळतसे …..७
स्पर्श तो मायेचा
एक आर्त साद
हवा तो केवळ
प्रतिसाद …..८
स्पर्श तो मायेचा
फेडू कसे ऋण
करितो नमन
सदोदित …..९
तसे तर तिच्या शिवाय आपले अस्तित्व शून्य आहे,अशक्य आहे,तिचे उपकार फेडण्यासाठी सुध्दा मला वाटते आपण अपूर्ण आहोत. त्यामुळे पूर्ण नाही पण काही अंशी तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्या तसेच कुणाच्याही माऊलीची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया ..!!
आपणही माझ्याशी सहमत आहात ना??
आईच्या चरणांशी🙏शतशः नमन🙏
••कैलास बडगुजर, टिटवाळा.
•~—————-~•
|| 🌹आई 🌹 ||
पौर्णिमेच्या चंद्राच,
आई शीतल चांदण l
नव रत्नाच्या खड्याच
आई सुवर्णी कोंदण ll
प्रतिबिंब पाहण्या
आई सुंदर आरसा l
जीवनाच्या काळोखात
आई चंदेरी कवडसा ll
चंचल मृग नाभीची
आई सुवासी कस्तुरी l
देण्या सुगंध सुखाचा
वाट चालते दुस्तरीll
जीवनाच्या मंदिराचा
आई तेजोमय कळस l
खडकात बहरणारा
आई मोहक पळस lk
प्रेमरसाने भरला
आई अमृताचा कुंभ l
तिच्या स्नेहसंगितान
जाई दणाणून नभ ll
प्राप्तीच्या प्राप्तव्याचा
आई सुखद हुंकार l
सप्त सुरांचा हा मेळ
तिच्या स्वराचा झंकार ll
आई शब्दात किमया
रोमांच आत नि बाहेर l
तिच्यामुळे साधे घर
घर बनते माहेर ll
घराघरात चैतन्य
तिच्या रूपाने नांदते l
दोन अक्षरी शब्दात
अवघे विश्व समावते ll
नाही कष्टाला त्या तोड
बैल घाण्याचा झुलतो l
भर चैत्राच्या उन्हात
गुलमोहर फुलतो ll
सुख दुःखात सावली
होतो आईचा पदर l
समर्पणाची तिच्या
करू जराशी कदर ll
मातृ प्रेमाचे ते बीज
मनामनात रुजवा l
तोलण्या कष्टाचे ते मोल
नाही भेटत ताजवा ll
मातृभक्तीचा तो दीप
राहो अखंड तेवत l
त्यासाठी कशाला हवे
मातृ दिनाचे औचित्य ll
🙏🌹मातृदिनाच्या खुपखूप शुभेच्छा🌹🙏
l🌹शुभम् भवतु🙏🌹l
•~———————-~•
Leave a Reply