आज ६ मे नारद🙏जयंती
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत.त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे.नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात.
नारद जयंती वैशाख कृष्ण प्रतिपदेला असते. ‘नार’ “या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो.पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे.”_ (‘नारं ददाति सः नारदः’) त्यांना स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक ह्या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो. त्यांचे एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. कीर्तनकलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.
नारदांच्या मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला,गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर केयूर व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात खडावा असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतीचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात.
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात.देवांमध्ये किंवा देवपत्नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.पण या कळी लावण्यामध्येसुद्धा जगाचे हित असते हे मात्र विसरून चालणार नाही.
नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये व सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात.
🪴🪴🪴
वैशाख वद्य प्रतिपदा या तिथीला नारदमुनींचा जन्म झाला,असे सांगितले जाते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार संगीत आणि वीणाचे जनक नारद ऋषी यांचा जन्म निर्माता ब्रह्मदेवाच्या कंठातून झाला होता. ब्रह्मदेवांचे मानस पुत्र असलेले देवऋषी नारद तीनही लोकांमध्ये मुक्त संचार करीत असत.
नारद मुनींचे नाव कानी येताच कानात एकच शब्द गुंजतो ‘नारायण-नारायण’. नारद मुनी, ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानानुसार, आकाश,पाताळ तसेच पृथ्वी या तीनही लोकी भ्रमण करून नारदमुनी देव, संत-महात्मे,इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधत असत. त्यांची सुख-दु:खे जाणून घेत अडचणी निवारण्यासाठी प्रयत्न करत. म्हणूनच ते देवांना जेवढे प्रिय होते, तेवढेच ते राक्षस कुळांमध्येही प्रिय होते. वैशाख वद्य प्रतिपदा या तिथीला नारदमुनींचा जन्म झाला, असे सांगितले जाते. ब्रह्मदेवांचे मानस पुत्र असलेले देवऋषी नारद तीनही लोकांमध्ये मुक्त संचार करीत असत. नारद जयंतीनिमित्त नारदमुनींच्या चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा…
पृथ्वी आणि पाताळ लोकातील माहिती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम देवऋषी नारद करीत असत. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार संगीत आणि वीणाचे जनक नारद ऋषी यांचा जन्म निर्माता ब्रह्मदेवाच्या कंठातून झाला होता. त्याला तिन्ही लोकात हवाई प्रवास करण्याचे वरदान लाभले आहे. महाराष्ट्रात नारद यांचे खूप कमी मंदिर असल्याचे समजते. पाहूया या मंदिरांविषयी….
पुण्यात अनेक जुनी मंदिरे सापडतात. ऐतिहासिक वास्तूंचा वारसा असणारे पुणे अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत नारद मंदिर देखील आहे.नारद मुनी यांचे मंदिर पुण्यात भिकारदास मंदिराच्या पाठीमागे आहे.त्याला नारद मंदिर म्हणूनच ओळखतात. मंदिरात इतर सात श्रेष्ठ मुनी – सप्तर्षिंच्या मूर्ती आहेत. मंदिरात रोज पूजा होते. सदाशिव पेठेत स्काऊट ग्राऊंड ते नारद मंदिर रस्ता असून याला नारद मंदिर पथ असे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील नारद मंदिर हे एकमात्र मंदिर असल्याचे सांगितले जाते.हे खूप प्राचीन मंदिर असून,या मंदिराला घेऊन एक कथा प्रचलित आहे.कथा अशी की,समुद्र मंथना वेळी जे अमृत निघाले होते ते दानवांपासून वाचवण्यासाठी भगवान विष्णू मोहिनी रूप धारण करून देवतांना देण्यासाठी ते इथेच आले होते. त्यावेळी नारदमुनी पण त्यांच्यासोबत इथे आले होते. त्यावेळीच त्यांचे हे मंदिर येथे स्थापित झाले असे म्हटले जाते.
नारदमुनींनी नारद पुराणाची रचना केली आहे. ते स्वत: उत्तम वक्ते आणि श्रोताही आहेत. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबरिष आदी महान व्यक्तिमत्त्वांना भक्तिमार्गावर घेऊन जाण्याचे श्रेय नारदांनाच जाते, असे मानले जाते. नारद पुराणात सर्व वेदांबाबत समान आदर व्यक्त करून त्यांची उपासना करण्याचे महत्त्व विषद करून सांगण्यात आले आहे. नारद पुराण हे मानवाच्या सहिष्णू वृत्तीचे आदर्श उदाहरणच आहे. नारद पुराणाचे महत्त्व दोन खंडांत असून, पूर्व आणि उत्तर या नावाने ते ओळखले जाते. पूर्वी या पुराणात २५ हजार श्लोक होते, पण सध्या त्यात १८ हजार श्लोक आणि २०७३ अध्याय आहेत.१८ पुराणांमध्ये हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.
🪴🪴🪴🙏🪴🪴🪴



Leave a Reply