सौ. ज्योती बडगुजर यांची संजीव फ्लेक्सी पॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून जर्मनी येथील डोसलडर्फ शहरात आयोजित केलेल्या ट्रेड शो व कॉन्फरन्स साठी निवड – श्री. महेंद्र बडगुजर, सुरत

पिंपळकोठा ह.मु. डोंबिवली येथील श्री.सुकलाल खंडू बडगुजर व सौ. उषा बडगुजर यांच्या सुनबाई, श्री. राजेश सुकलाल बडगुजर यांच्या धर्मपत्नी, धरणगांव येथील कै. सुधाकर नामदेव बडगुजर व श्रीमती अलका बडगुजर यांची कन्या सौ. ज्योती राजेश बडगुजर यांची संजीव फ्लेक्सी पॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून जर्मनी येथील डोसलडर्फ शहरात आयोजित केलेल्या ट्रेड शो आणि कॉन्फरन्स साठी निवड झाली आहे. कॉन्फरन्स आणि ट्रेड शो हा दि. ०२.०५.२०२३ पासून सुरुवात होणार आहे. सौ. ज्योती राजेश बडगुजर यांचे शिक्षण हे बी.सी.ए. पदवीधर असून संजीव फ्लेक्सी पॅक लिमिटेड या कंपनीमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत आहेत. सौ. ज्योती राजेश बडगुजर ह्या कै. नामदेव झिपरू बडगुजर तलाठी आप्पा राहणार धरणगाव यांची नात व सेवानिवृत्त तहसीलदार श्री.पुरुषोत्तम नामदेव बडगुजर यांच्या पुतणी आहे. सौ. ज्योती बडगुजर यांच्या या वाटचालीत त्यांचे पती श्री. राजेश बडगुजर यांचे मोलाचे योगदान लाभले. सौ. ज्योती बडगुजर त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सौ. मोनाली व श्री. किरण मधुकर बडगुजर मुंबई पोलीस कल्याण, सौ. दामिनी व श्री. तुषार सुधाकर बडगुजर कालवा निरीक्षक धरणगाव, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप, धरणगांव पंच मंडळ यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

3 Comments

  1. सौ.ज्योती ताई हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक श्रीविठ्ठलमय शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*