जळगांव येथील श्री.बापू धोंडू बडगुजर हे सेवानिवृत्त – श्री. मधुकर रघुवंशी, एरंडोल


जळगांव -येथील रहिवाशी श्री. बापू धोंडू बडगुजर हे दि.३०/०४/२०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे मूळ गाव खेडी कढोली ता. एरंडोल धोंडू मोतीराम बडगुजर याचे चिरंजीव, ते पोष्टमन म्हणून पोस्टात नोकरीस होते. त्या काळी 5 K. M. रिंगणगाव येथून दररोज टपाल आणावे लागत होते. धोंडू शेठ यांनी अगदी प्रामाणिक पणे सेवा केली. बापूंचा जन्म १५/०४/१९६३ चा त्यांना १९/०३/२९९० ला पाचोरा येथे रेल्वेत group-D मध्ये नोकरी लागली. ३ वर्ष सेवा केल्यावर बदली मंडल रेल प्रबंधक कार्यालय भुसावळ येथे झाली त्याठिकाणी ३० वर्ष सेवा केल्यावर कार्यालय अधीक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. कढोली येथील नामदेव देवचंद बडगुजर यांची मुलगी सौ. शारदा यांचेशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले अमोल हा B. E. Civil असून नाशिक येथे तर मनीष हा B. E. मेकॅनिकल असून पुणे येथे नोकरीस आहे. बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव यांच्या कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. समाजाची सेवा घडत राहो. हीच प्रभू चरणी प्रार्थना. श्री. बापू धोंडू बडगुजर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून सेवानिवृत्ती च्या शुभेच्छा. 🌹🌹🎁🎁

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*