एरंडोल येथील रहिवाशी श्री. प्रभाकर नारायण बडगुजर आज दिनांक 30/4/2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे मूळ गाव पिंपळकोठा ता. एरंडोल. वडिलांचे नाव नारायण छगन बडगुजर. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी. वडिलांचा शेतीचा व्यवसाय होता. महाराष्ट्रदिनी 1963 मध्ये प्रभाकर भाऊंचा जन्म झाला. त्यांच्या सेवेची सुरुवात 30/7/1986 रोजी गोदावरी पाटबंधारे विभाग येवला जि. नाशिक येथे झाली. त्या ठिकाणी 10 वर्ष सेवा केल्यानंतर गिराणा पाटबंधारे उपविभाग एरंडोल येथे त्यांची बदली झाली. आणि आज टपाली /प्रभावी वायरलेस या पदावरून सेवानिवृत्त झाले. पिंपरखेड येथील श्री. गुलाब भावडू बडगुजर यांची कन्या सौ. ललिता ताईंशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दिलीप आणि भूषण दोन मुले असून नाशिक व सुरत येथे नोकरीस आहेत. चार महिन्यापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यातून ते आता सावरले आहेत. कोणाशीही वैर, द्वेष भावना न ठेवता गोड बोलून त्यांनी अधिकाऱ्यांची मने जिंकली. बडगुजर समाजाच्या प्रत्येक कार्यात दोघांचा सहभाग असतो. अशा या प्रेमळ प्रभाकर भाऊंना सेवानिवृत्ती साठी अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री प्रभाकर बडगुजर – 94237 71072
Leave a Reply