धुळे, ३० मार्च २३ : बडगुजर समाजाची कुलदैवता श्री चामुंडामाता मंदिर कामाचे धुळे शहरातील पांझरा नदी किनारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. मंदिर उभारणीसाठी बडगुजर समाजाच्या श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून पांझरा नदी किनारी श्री एकवीरादेवी मंदिर रोडवरील हत्ती डोहापुढे मंदीर साकारत आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार कदमबांडे, वास्तुविशारद रवी बेलपाठक, पंचायत समिती सदस्या सुरेखा बडगुजर, धुळे श्री चामुंडामाता ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, लोहारी येथील श्री चामुंडामाता ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र बडगुजर प्रमुख अतिथी होते. यशवंत बडगुजर, सुधीर बडगुजर, सुभाष बडगुजर, गुलाब बडगुजर, राजू बडगुजर, संजय बडगुजर, सुधाकर बडगुजर, बुधा बडगुजर, सतीश बडगुजर, लक्ष्मण बडगुजर, मनोज चव्हाण, महेंद्र बडगुजर, भूपेश बडगुजर, शेखर बडगुजर, संतोष बडगुजर, किरण बडगुजर, सुनील बडगुजर, हेमराज बडगुजर, प्रशांत बडगुजर, गोकुळ बडगुजर, रूपक बडगुजर, अमोल बडगुजर, दीपक बडगुजर आदी उपस्थित होते.
श्री. कदमबांडे म्हणाले, की बडगुजर समाजाची ऐकी वाखाणण्याजोगी आहे. बडगुजर समाजाची कुलदैवता श्री चामुंडामातेचे मंदिर चोटीला (गुजरात) येथे आहे. तेथे प्रत्येकाला जाणे शक्य होणार नसते. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना श्री चामुंडामातेचे दर्शन घेता यावे यासाठी धुळे शहरात मंदिराची उभारणी केली जात आहे. हे प्रशंसनीय कार्य आहे. श्री. बेलपाठक, श्री. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
पंढरीनाथ बडगुजर यांनी सांगितले, की मंदिर कार्यासोबत श्री चामुंडामाता ट्रस्टतर्फे बडगुजर समाजातील गरजू, गरीब व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी मदत केली जाईल आणि विविध विधायक उपक्रम राबविले जातील. मंदिरकामी आर्थिक मदत देता येणे शक्य नसलेल्या समाजबांधवांनी वाळू, खडी, सिमेंट वा आनुषंगिक साहित्य पुरविले, वेळ व श्रमिक योगदान दिले तरी स्वागत असेल. खो- खोचे राष्ट्रीय खेळाडू आणि धुळे श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी या मंदिरासाठी २३०० स्क्वेअर फूट जागा दान दिली आहे. त्यामुळे मान्यवरांनी पंढरीनाथ बडगुजर यांच्या दानशूरतेची प्रशंसा केली. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात दानशूर पंढरीनाथ बडगुजर, मुकेश बडगुजर, पुष्पलता पांडुरंग बडगुजर, तुषार भगवान चव्हाण, राजेंद्र त्र्यंबक बडगुजर यांचा विशेष सत्कार झाला. हिरालाल बडगुजर यांनी सूत्रसंचलन केले. राजेंद्र बडगुजर यांनी आभार मानले.
Leave a Reply