“स्कोडा मोटर्स” येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून गेल्या ११ वर्षापासून कार्यरत असलेले श्री.अतुल प्रकाश बडगुजर यांची स्कोडा मोटर्स छ.संभाजीनगर मार्फत इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या प्लांट उभारणीसाठी सिलेक्शन झाले आहे.
सातत्यपूर्ण मेहनत, कामाची सचोटी व कामाची गुणवत्ता या निकषांवर त्यांची “इंडोनेशिया” येथे उभारल्या जात असलेल्या स्कोडा प्लांट साठी मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे.
दि.२५ फेब्रुवारी रोजी श्री.अतुल बडगुजर हे छ.संभाजीनगर हुन इंडोनेशियासाठी रवाना झाले आहेत. साधारण एक महिना राहुन प्लांट उभारणी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
श्री.अतुल बडगुजर हे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे खजिनदार व महासमितीचे शिक्षण समिती प्रमुख माननीय श्रीयुत प्रकाश धुडकू बडगुजर (पी.डी.सर) यांचे चिरंजीव आहेत.
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप, बडगुजर डॉट इन कडून श्री.अतुल बडगुजर यांना भावी वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा.
Leave a Reply