डोंबिवली येथे बडगुजर समाजाचे स्नेह संमेलन व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

। श्री गणेशाय नम : ।।
।। श्री चामुंडा माताय नम:।।
।।कुलदेवतेनम:।।
डोंबिवली:दिनांक. १९/०२/२०२३. रविवार रोजी सिध्दीविनायक गणेश मंदिर, गोखले हॉस्पिटलच्या बाजूला एमआयडीसी डोंबिवली (पूर्व) येथे समस्त बडगुजर समाज मंडळ,डोंबिवली शहर यांचे तर्फे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रथम मंडळाची स्थापना ज्यांच्या संकल्पनेतून उदयास आली ते श्री एस् एम् बडगुजर, श्री आर बी चव्हाण , श्री सुकलाल खंडू बडगुजर, श्री.संजय रघुनाथ बडगुजर तसेच श्री मोहन शेठ बडगुजर व मंडळाचे अध्यक्ष श्री मनोज भिकनराव बडगुजर व इतर जेष्ठ समाज बंधू भगिंनीच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनकरून संमेलनाचे उद्घाटन झाले. बडगुजर समाजाची कुलदैवत माता चामुंडाच्या प्रतिमेचे तसेच अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री.भिकनराव बडगुजर, श्री आर. बी. चव्हाण, श्री.रामकृष्ण पवार ,यांचे हस्ते पुष्पहार टाकून करण्यात आले. कार्यक्रमात समाजातील दिवंगत समाज बंधू आणि भगिनींना श्रध्दांजली वाहण्यात आली.
उपरोक्त मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज भि. बडगुजर यांनी तयार केलेल्या मंडळाच्या मागील तीन दशकाच्या कामकाजाचे व माहिती पटाच्या वाचनाने प्रा. श्री.शितलप्रसाद बडगुजर सर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जेष्ठ समाज बांधव श्री.आर बी चव्हाण साहेब यांनी सामाजिक कार्यक्रमाविषयी प्रोत्साहन, प्रबोधनपर मार्गदर्शन केले. तसेच श्री.मोहन बडगुजर यांनी आपल्या शैलीत महिला वर्गानी चालवलेल्या भीशीचा सातत्य उपक्रम राबविले बद्दल त्यांचे कौतुक केले.श्री.एस् एम् बडगुजर यांनी बडगुजर समाजास महाराष्ट्र राज्याच्या व केंद्रीय ओबीसी संदर्भात सद्यस्थितीत परिस्थितीचा आढाव्याची माहिती अवगत करुन दिली.
कार्यक्रम प्रसंगी सि.ए.(इंटरमिजीएट) या केंद्रीय स्तरावरील परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेली डोंबिवली येथील बडगुजर समाजाची गुणी विद्यार्थिनी कुमारी पूर्वा महेश बडगुजर , तसेच उत्कृष चित्रकार व “मितांशू” या यूट्यूब चॅनल चा संचालक कुमार मितांशु मोहन बडगुजर व उभरती कलाकार अतिशय लहान वयात मराठी मालिकेत काम करणारी कुमारी नाविण्या मिलिंद बडगुजर यांचा त्यांच्या आई वडिलांसोबत सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती अंतर्गत वैद्यकीय समिती प्रमुख डॉ. उमेश बडगुजर यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जेष्ठ महिला व जेष्ठ पुरुष यांचे बी.पी., शुगर, वगैरे मेडिकल बाॅडी चेकअप केले. त्यात ५० पेक्षा अधिक समाज बांधवांनी सहभाग घेतला. त्यात ५ समाज बांधवांना पहिल्यांदा त्यांना उच्च रक्तदाब किंवा डायबेटिस असल्याचे कळाले. तसेच या शिबिरा साठी दोन महिला डॉ. श्रध्दा बडगुजर, डॉ.आदिती बडगुजर यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच त्यांनी उपस्थित समाज बंधू आणि भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यानंतरच्या सत्रात दुपारी उपस्थित बंधू आणि भगिनीं, बाल, गोपाल सर्व मंडळींनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. पुढील सत्राची सुरवात श्री मोहन बडगुजर यांच्या सुमधूर आवाजातील गीतांनी झाली. उपस्थित लहान मुलां- मुलींनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. महिलांसाठी संगीत खुर्चीचा खेळ आयोजित करण्यात आला होता. नंतर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.शितलप्रसाद बडगुजर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. आर. बी. चव्हाण, श्री.संजय रघुनाथ बडगुजर, सौ. नुतन बडगुजर, सौ. संगिता बडगुजर, सौ. निर्मला बडगुजर ,श्री. रामकृष्ण पवार, श्री. मनोज बडगुजर ,प्रा. शितलप्रसाद बडगुजर,श्री.महेश बडगुजर,श्री. भुषण बडगुजर, श्री. सुजीत बडगुजर यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व कार्यकारणी पदाधिकारी व सभासद यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता आणि आभार डोंबिवली समाज अध्यक्ष श्री.मनोज भि. बडगुजर यांनी केले.

आपले विनीत,
अध्यक्ष : श्री.मनोज भि.बडगुजर मो.7208202929.
सचिव : श्री.शितलप्रसाद द. बडगुजर मो.7977141629.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*