शिवकेसरी राज्यस्तरीय कुस्ती 2023 स्पर्धेमध्ये अमरावती येथील चि. वेदांत संजय वासेवाय उपविजेता – श्री. लोकेश कोतवाल, पुणे

🚩 शिवकेसरी राज्यस्तरीय कुस्ती 2023
स्पर्धेमध्ये अमरावती येथील चि. वेदांत संजय वासेवाय उपविजेता .
गुजर बडगुजर समाज अमरावती क्रीडा क्षेत्रात, आणि मुख्यता कुस्तीच्या क्षेत्रात नेहमीच वर्चस्व गाजवत आलेला आहे. त्याचे प्रत्यक्ष दर्शन वेदांच्या रूपाने पाहावयास मिळाले.
नुकतेच राज्यस्तरीय कुस्ती दंगलीचे आयोजन अमरावती येथील मनीबाई गुजराती शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये अमरावती, यवतमाळ ,अकोला, वाशिम बुलढाणा ,नागपूर ,जळगाव, सांगली ,कोल्हापूर ,या जिल्ह्यातून अनेक पैलवानांनी कुस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले . त्यामध्ये कुमार गटात चि. वेदांत संजय वासेवाय यांने द्वितीय स्थान प्राप्त करत समाजाचा गौरव वाढविला आहे.वेदांचे प्रोत्साहन वाढवण्याकरिता यावेळी समाजातील
श्री राजेंद्र नथुजी भेरडे
श्री आशिष रविंद्रराव पाटील
आकाश कोतवाल
वेदांचे वडील श्री संजय नरेंद्र वासेवाय.
तसेच वासेवाय परिवार आणि मित्र मंडळ उपस्थित होते.
उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल गुजर बडगुजर समाज अमरावती व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*