चोपडा येथील कपड्याचे प्रसिद्ध दालन राहुल एम्पोरिअम ला रात्री अचानक शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. याविषयीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे श्री. दिपक बडगुजर व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. व लागलीच आगीचे स्वरूप पाहता अग्निशमन दलाच्या गाड्यांना फोन करून तातडीने घटनेची माहिती दिली. रात्री उशिरा आग लागल्यामुळे तातडीने मदत पोहचण्यासाठी वेळ लागला. घटनास्थळी उपस्थित श्री. दिपक बडगुजर यांनी वेळीच पोहचून आगी मध्ये अडकलेल्या ४-५ लोकांना जिवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. श्री. दिपक बडगुजर यांच्या समयसूचकते मुळे व त्यांनी दाखविलेल्या हिमंतीमुळे मोठी जिवित हानी टळली.
श्री. दिपक यांनी केलेल्या शौर्यवान कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या कामगिरी ला बडगुजर. इन टिमचा मानाचा मुजरा.

Leave a Reply