अलिबाग, जिल्हा रायगड येथे राहणारे व मुळगाव चोपडा येथील श्री. किशोर शिवदास बडगुजर यांची आज दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी, RCF फेर्टीलायझर्स, थळ, अलिबाग या कंपनी मध्ये ३६ वर्षे प्रदिर्ग सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली. त्यांचा सन्मान समारोह आरसीएफ या कंपनीमध्ये आज रोजी पार पडला.
श्री किशोर यांचा जन्म दि . १० जानेवारी १९६३ रोजी झाला, त्यांनी चोपडा येथून बीएससी केमिस्ट्री चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1983 मध्ये त्यांनी ‘युनिक शुगर्स लिमिटेड, दोंडाईचा’ येथे ‘प्रोडक्शन शिफ्ट इन्चार्ज’ या पदावर दीड वर्ष नोकरी केली.
पुढे त्यांनी जानेवारी 1985 मध्ये नवी मुंबई येथील ‘उमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये ‘प्रोडक्शन सुपरवायझर’ या पदांवर त्यांनी नोकरी केली
यापुढे ऑगस्ट 1985 पासून ते आज पर्यंत त्यांनी अलिबाग येथील ‘आरसीएफ फेर्टीलायझर्स लिमिटेड’ (सुफला व उज्वला यांसारख्या अनेक प्रसिद्ध खतांसाठी नामांकित) या कंपनीमध्ये जॉब केला . 1985 मध्ये ट्रेनी या पदावर सुरुवात केलेले श्री किशोर यांनी पुढे वेगवेगळ्या पदव्या तसेच अनुभव घेत “सीनियर स्पेशल ग्रेड प्लांट ऑफिसर” या पदापर्यंत मजल मारली व आज ते या पदावरून निवृत्त झाले.
त्यांनी आपल्या आयुष्यातील 36 वर्ष या कंपनीसाठी दिली. सध्या ते “बाष्प निर्मिती संयंत्र” या विभागात कार्यरत होते. आपल्या नोकरी दरम्यान त्यांनी “एलएलबी” चे शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद देखील घेतली.
स्वभावाने शांत व मनमिळावू असलेल्या श्री किशोर यांना त्यांची पत्नी सौ . माधवी यांनी त्यांच्या प्रगतीमध्ये मोलाची साथ दिली. तसेच मुलगी डॉ. सौ शामली गणेश बडगुजर व जावई श्री. गणेश प्रकाश पवार हे उच्चशिक्षित असून सध्या पनवेल येथे राहत आहेत.
मुलगा ऍड. मयूर बडगुजर हादेखील वकील असून पनवेल येथे स्वतःची प्रॅक्टिस करीत आहे
शुभेच्छांसाठी श्री. किशोर शिवदास बडगुजर 8169935031
गरीब कुटुंबातून पुढे आलेले व स्वकर्तृत्वावर आजपर्यंत मजल मारलेले किशोर यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त आपणा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा…
Leave a Reply