बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे शनिवार दिनांक २८.०१.२०२३ रोजी मराठा समाज हॉल, कल्याण (प) येथे भव्य-दिव्य असा महिलांसाठीचा हळदी-कुंकुचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धां घेऊन, ३५ पेक्षा जास्त विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ नीलिमाताई मनोज बडगुजर- पनवेल ह्या होत्या, तर प्रमुख मान्यवर म्हणून सौ वैजनतीताई घोलप- गुजर (मा महापौर- कल्याण महापालिका) व सौ लताताई बापू बडगुजर – कल्याण (उद्योजिका) ह्या होत्या. तसेच प्रमुख अतिथी सौ मीनाताई भगवान बडगुजर -पनवेल, सौ प्रतिभाताई संजय बडगुजर- जळगाव, सौ सरस्वती संतोष पवार, सौ शोभा शांताराम भिलमाल व सौ कल्पना धर्मेंद्र बडगुजर -शिरपूर इत्यादी होत्या.
मंडळाचे अध्यक्ष- श्री बापू किसन बडगुजर यांनी प्रास्ताविक भाषण केलेत. त्याचप्रमाणे सौ मीनाताई बडगुजर व सौ प्रतिभाताई बडगुजर यांनीही समाज संघटन केले पाहिजे ह्यावर भाषण केले. सौ वैजनती ताई घोलप यांनीही समाज महिलांना मार्गदर्शन केलेत व सर्वांनी संघटित झाले पाहिजे, संघटनेशियाय पर्याय नाही त्याच पद्धतीने भविष्यात काहीही गरज लागली तर मी तुमच्या बडगुजर समाजाच्या सोबत असेल असेही त्यांनी कार्यक्रमात सांगितले. सौ नीलिमा ताईंनी सुद्धा आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडले की -आपण सर्व मुंबईतील समाज बंधू-भगिनींनी एकत्र येऊन संघटित झाले पाहिजे व इत्यादी. त्यानंतर वाण देऊन हळदी-कुंकुचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नंतर अनेक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्यात, सर्व महिलांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन एक आनंद साजरा केला. जवळपास 35 पेक्षा जास्त विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सदर बक्षिसे – व्यासपीठावर विराजमान असलेले श्री धर्मेंद्र पोपट बडगुजर -शिरपूर, डॉ श्री मनोज उत्तमराव बडगुजर- पनवेल, श्री श्रीकृष्ण भिका बडगुजर-ठाणे, श्री श्रीराम विश्वनाथ बडगुजर -बदलापूर, सौ नीलिमा ताई मनोज बडगुजर -पनवेल यांच्या हस्ते देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ राजश्री संजय भिलमाळ-उल्हासनगर व सौ रत्ना देवेंद्र पवार -कल्याण यांनी केलेत, त्यांचेही फूल-गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर भव्यदिव्य कार्यक्रमास श्रीयुत ज्ञानेश्वर मोरडीया यांनीही खूप परिश्रम घेतले त्यासंधर्भात त्यांनाही फूल गुच्छ देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष- श्रीयुत बापू किसन बडगुजर यांनी आभार प्रदर्शन मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सौ संध्या ताई-कल्याण, वंदना बाई -कल्याण (प), सौ अलकताई -कल्याण (पू), लताताई- कल्याण (प), सौ नीलिमा ताई व सौ मीना ताई – पनवेल, सौ राजश्री भिलमाल, सौ रत्ना पवार, सौ पूजा कल्पेश बडगुजर, यांनीही परिश्रम घेतले/ सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही आभार मानून धन्यवाद देण्यात आले.
त्याचप्रमाणे कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला भगिनी व समाज बांधव यांचेही मनापासून आभार मानण्यात आले. बाहेरगावाहून आलेल्या पाहुणे मंडलीचेही आभार मानण्यात आले.
आपला
श्री बापू किसन बडगुजर – अध्यक्ष
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
ठाणे, मुंबई, पालघर, नवी मुंबई व कोकण परिसर
Leave a Reply