अहमदाबाद :- दि .26/1/2023 रोजी श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट अहमदाबाद मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शहीद वीर मंगल पांडे ऑडोटेरीयम हॉल, ओढव, अहमदाबाद येथे उत्साहाने २६ जानेवारी निमित्त कार्यक्रम करण्यांत आला .
प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथिल श्री मोहन हिरालाल बडगुजर . अ भा . बडगुजर समाज कल्याण समिती अध्यक्ष ( प्रमुख) व भाजपाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस . श्री अनिकेत सुभाष बडगुजर . उद्योजक मेहसाना . व श्री . धर्मेंद्र पोपटराव बडगुजर . शिरपूर . अ भा . बडगुजर समाज कल्याण – ओबीसी समिती प्रमुख . नवनिर्वाचीत शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळ उपस्थित होते .
कोरोना काळात मृत झालेले समाज बांधव व वीरमरण आलेल्या सैनिकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यांत आली . सरस्वती वंदना करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यांत आला श्री. मोहन हिरालाल बडगुजर व श्री . धर्मेंद्र पोपटराव बडगुजर यांनी समाज प्रबोधन केले . श्री . सुशिल विनोद मर्दाने सचीव यांनी अहवाल वाचन केले . अध्यक्ष श्री . जगदिश अभिमन दैवत यांनी प्रास्ताविक केले व मोठ्या पडद्यावर उद्योजकांच्या जाहीराती दाखवून उद्योगास प्रेरीत होण्यासाठी आवाहन करण्यांत आले .
या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार लॅपटॅप बॅग देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सेवानिवृत व्यक्तिंचा सन्मान शाल व बुके देऊन करण्यांत आला. अपंग सहाय्यता . पाकीट देऊन अपंगांना मदत करण्यांत आली . तसेच विधवा माता बघिनींना पाकीट देऊन आर्थिक सहाय्य करण्यांत आले .
संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यत आयकॉन फाऊंडेशन प्रेझेट मस्तीभरा है समा इंटरटेनमेंट म्यूझिकल कराओके शो श्री मोहन हिरालाल बडगुजर व त्यांची टीम मुंबईमार्फत सादर करण्यांत आला . लोकांनी कार्यक्रमास भरभरून साथ दिली, कार्यक्रमाचा आनंद लुटला व सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली
Leave a Reply