📖शैक्षणिक बातमी📖
४३ वे धुळे शहर व ग्रामीण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२-२३ यशस्वीरित्या संपन्न.
मार्गदर्शक श्री.किरणचंद्र चंद्रकांत साळुंखे,{के.सी.साळुंखे सर}अध्यक्ष,धुळे शहर विज्ञान गणित अध्यापक संघ धुळे यांचे,”संरक्षण के साथ संवर्धनःबहुउपयोगी छाता” हे उपकरण सर्वप्रथम
धुळेः.येथील शिक्षण विभाग पंचायत समिती,मुख्याध्यापक संघ,धुळे शहर व ग्रामीण विज्ञान व गणित अध्यापक मंडळ तथा शिवाजी विद्या प्रसारक संस्था अंर्तगत आर. आर.पाडवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,स्टेशन रोड,धुळे येथे सोमवार दि.२३ व २४ जानेवारी २ दिवसीय “विज्ञान प्रदर्शन” आयोजित करणेत आले.
उध्दाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी,डॉ.एस.टी.पाटील,सिनेट सदस्य,कवियित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे होते.डॉ.मंजुषा क्षीरसागर, प्राचार्या,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धुळे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याचे उध्दाटन झाले.
सदर कार्यक्रमास धुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर बंधूभगिनी व विद्यार्थीगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामिण भागातील २0५ व शहरी भागातील १३५ उपकरणांचा सहभाग होता तसेच शिक्षक परिचर गटात १५ उपकरणांचा सहभागी होते.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय “तंत्रज्ञान आणि खेळणी”असा होता सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरून दिलेला उपविषय”पर्यावरणास अनुकूल सामग्री व वर्तमान उपक्रमासह ऐतिहासिक विकास”,याला अनुसरून संरक्षण के साथ संवर्धनःबहुपयोगी छाता हे मॉडेल बनवले होते सदरहू उपकरण बनवण्याचे मागे समाजातील कष्टकरी,गोरगरीब जसे रस्त्याच्या कडेला भाजीपाला,फळ,पाणीपुरी,मासे,लाह्या फुटाणे,चहा विकणारे,दुचाकी तीन चाकी सायकल स्वार तसेच लोट गाडी वर विक्री करणारे फेरीवाले,भंगारवाले,कांदे-लसूण,कटलरी विकणाऱ्या व्यक्तींना ऊन-पाऊस पासून संरक्षण सोबत,घरापासून दिवसभर बाहेर असलेल्या या व्यक्तींना लाईट,फॅन,स्पीकर, मोबाईल इत्यादी गोष्टी चार्जिंग करण्यासाठी विद्युत ऊर्जेची गरज असते, दिवसभर त्यांनी घेतलेली बॅटरी ऐनवेळेस चार्ज करणे कुठेही शक्य नसते तसेच वाढत्या वीज बिलावर उपाय म्हणून हे उपकरण बनवले आहे सूर्यापासून मिळणारी फुकटची ऊर्जा छत्रीच्या वर लावलेल्या सोलर प्लेट-ज्या खेळण्यामध्ये वापरले जातात, त्याचा वापर केला आहे दिवसभर सोलर प्लेटच्या साह्याने बॅटरी चार्ज होत राहते व संध्याकाळी आवश्यक असलेला प्रकाश, उन्हाळ्यामध्ये फॅन,स्पीकर, मोबाईल चार्जर तसेच सीसीटीव्ही चालेल अशी सोय छत्रीच्या खाली आतून केली आहे .
उपकरणाचे↕️फायदे:
हे उपकरण पर्यावरण पूरक पारंपरिक ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन,पैशाची बचत करणारे व वाढत्या वीज बिलावर उपाय,अल्पखर्चिक सहज जोडता येण्याजोगे,प्रदूषण विरहित,समाज उपयोगी उपकरण व बहुउपयोगी उपकरण आहे.सदर उपकरणाचा समावेश “४३ वे धुळे शहर व ग्रामीण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२-२३ मध्ये करण्यात आला होता.
“धुळे शहर विभागातून उच्च प्राथमिक या गटातून,श्रीमती सिताबाई शंकर माळी कन्या हायस्कूल देवपूर धुळे,इ ८ वीचे कु.अर्चना कैलास कोळी,चि.भाग्येश लतीश पाठक,कु.जान्हवी प्रभाकर सोनवणे,यांचेसाठीचे
उपकरणः”संरक्षण के साथ संवर्धनःबहुउपयोगी छाता” हे उपकरण निर्माता व मार्गदर्शक:श्री.किरणचंद्र चंद्रकांत साळुंखे[के.सी. साळुंखेसर],M,Sc.BEd] विज्ञान शिक्षक, एस्.एस्.माळी कन्या हायस्कूल धुळे,अध्यक्ष,धुळे शहर विज्ञान-गणित अध्यापक संघ,धुळे. यांचे उपकरणास प्रथम क्रमांक मिळाले बद्दल धुळे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष,मा.बापूसाहेब शिवमूर्ती सदाशिवराव खलाणे,सचिव श्री.उदय हिंमतराव महाजन, मुख्याध्यापिका,एस्.एस्.माळी कन्या हायस्कूल,श्रीमती जे.एम्.महानुभाव,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थ्यांतर्फें सत्कारासह अभिनंदन करण्यात आले.
तसेच धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग आणि धुळे व परिसरातील बडगुजर समाजात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्रॉउड फॉउंडेन्शन,बडगुजर.इन टीम,क्षत्रिय बडगुजर शिक्षण संस्था(धुळे बोर्डींग),समस्त बडगुजर समाज व साळुंखे परीवार चोपडा धुळे यांचे कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
🌹🪷🌹🪷🌹🪷🌹
छान, उपयुक्त 👌👌
Congratuletion kiran sir
Congrats Kiran
Keep it up
Best Wishes for Future Continue Success
🙏👍💐