धुळेः येथील श्री.मनोज दत्तात्रय चव्हाण यांची कन्या कु.तनिष्का ही राज्यस्तरीय विभागीय कुस्ती स्पर्धा नाशिक विभाग (अहमदनगर, नाशिक,धुळे,जळगाव व नंदुरबार)स्पर्धेत ५५किलो. गटात तृतीय क्रमांक पटकावला. कु.तनिष्का ही कै.दत्तात्रय शंकर बडगुजर,मुकटी-धुळे यांची नात व मनपा धुळेचे रचनाकार विभागगाचे रावसाहेब श्री प्रदिप चव्हाण यांची पुतणी होय.
कु.तनिष्काच्या यशाबद्दल मुकटी व धुळे येथे सर्वत्र कौतुक होत असून मुलीने आपल्या आजोबांच्या नावालौकिकात भर टाकल्याचे बोलले जात आहे व सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु.तनिष्काला मा.श्री. सुधीरकुमारजी जाधव,अध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था, उपाध्यक्षा मा.आशा जाधवमॅडम,राजू जाधवसर, पै.जगदीश चौधरीसर,श्री सुनील चौधरी सर श्री.आर.डी.बडगुजर साहेब,श्री. पंढरीनाथ बडगुजरसर.श्री. मनोहरआण्णा बडगुजर.श्री हेमंत भदाणेसर तसेच पै.लड्याभाऊ,यांचे मार्गदर्शन लाभले.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती,क्षत्रिय बडगुजर समाज शैक्षणिक संस्था(धुळे बोर्डींग),ग्रामस्थ मुकटी,बडगुजर प्रॉउड फॉऊंडेन्शन,बडगुजर.इन टीमतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Leave a Reply