डॉ. श्री. प्रारब्ध बडगुजर यांचे पेटंट ला मान्यता व त्याचे सर्व अधिकार त्यांच्या विद्यापीठाला २० वर्षासाठी मिळाले – श्री. परेश चुडामण बडगुजर, मालेगाव

थाळनेर ता.शिरपूर, ह.मु.  सोनिपत (हरियाणा) येथील श्री.चंद्रकांत भिका बडगुजर (सेवानिवृत्त मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र) यांचे चिरंजीव डॉ. श्री. प्रारब्ध चंद्रकांत बडगुजर यांनी बडगुजर समाजाचे नाव उंच शिखरावर  पोहचले व नाव लौकिक मिळवले. डॉ.श्री.प्रारब्ध बडगुजर यांनी एक नविन अविष्कार जो या आधी नव्हता तो पेटंट त्यांनी केला. त्याचे सर्व अधिकार हे त्यांच्या विद्यापीठाला २० वर्षासाठी मिळाले त्यांचे शिक्षण हे MVSc, PhD (Pharmacology and Toxicology) असुन खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालय ,भारत सरकार
(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट, एन इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स) येथे एप्रिल २०१२ पासून फूड टॉक्सिकॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना बरेच पारितोषिक ही मिळाले आहेत :-
1. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगलोर द्वारे समर रिसर्च फेलोशिप
2. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून इनस्पायर फेलोशिप प्रदान करण्यात आली.
3. इस्रायल सरकारकडून MASHAV शिष्यवृत्ती प्रदान.
डॉ.श्री.प्रारब्ध बडगुजर यांच्या पेटंट बदल थोडी माहिती जाणून घेऊ – पेटंट हे समोसा सारख्या पारंपारिक स्नॅक्ससाठी विकसित केलेल्या खाद्य लेपबद्दल आहे जे तेल/चरबी कमी करण्यास मदत करते.
    हे खरं तर खाण्यायोग्य कोटिंग रचना आहे आणि त्यातील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी वापरले जाईल. पारंपारिक स्नॅक्स उदा. समोसा यावर सर्व प्रयोग केले गेले आहेत.
     प्रयोगात चरबीचे प्रमाण सुमारे 15-30% कमी आढळले……..
घरगुती आणि विशेषत: संघटित स्नॅक दिग्गजांसाठी प्रक्रिया तंत्रज्ञान अत्यंत योग्य असेल. गोठवलेल्या समोसा उत्पादक आणि निर्यात दारांसाठी (हल्दीराम आणि तत्सम )
     सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लेपित समोसा आणि सामान्य (नियंत्रण) समोसा सारखाच दिसतो आणि चवीनुसार कोणतेही संवेदी गुणधर्म बदललेले नाहीत. ही प्रक्रिया मोदक आणि तत्सम स्नॅक्ससाठी देखील काम करेल ज्यांना बाह्य आवरण म्हणून मैदा असेल. डॉ. श्री. प्रारब्ध चंद्रकांत बडगुजर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


डॉ.श्री.प्रारब्ध बडगुजर :-  94165 41177

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*