जळगांवः येथील भूषण प्रताप चव्हाण(बडगुजर) श्री.प्रताप सिताराम बडगुजर,वाहक,राज्य परिवहन,जळगाव यांचा सुपुत्र तसेंच जळगाव येथील प्रसिध्द बासरीवादक श्री.रामदास बंडू बडगुजर यांचा नातू “गिटारिस्ट” असून,जळगाव येथील सेंट जोसेफ कॉनव्हेंट स्कूलमधे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.आजोबा,मामा,मावशी यांची संगीताची आवड व रूची बघत आपणही काहीतरी नवीन करण्याचे उद्देशाने गिटार वाजविणेत रस घेतघेत “गिटारिस्ट” केव्हा बनला हे त्याच्याही लक्षात आले नाही.
भूषण याने एम.सी.ए, बी.एस्.सी.(IT),बी.ए बी.एड (संगीत-वाद्ये) आदि शैक्षणिक प्रगती केली आहे व सध्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल जळगाव,येथे शिक्षक म्हणून व स्वर साधना संगीत विद्यालय,जळगाव येथे गिटार शिकवित असतो.
भूषण यांस संगीत क्षेत्रांत खालीलप्रमाणे पुरस्कार मिळालेले आहेत.
१. राष्ट्रीय पातळीवरील आंतर विद्यालयीन स्पर्धेत प्रथम.
२. राष्ट्रीय पातळीवरील पॕट्रीआॉटीक गायन स्टर्धेत व्दितिय क्रमांक
३. गोदावरी करंडक, जळगाव “भावगीत स्पर्धा” प्रथम क्रमांक
४. यूथ फेस्टीवल जळगाव,प्रथम क्रमांक
५. ख्रिस्ट्रीयन स्कूल इंन्स्ट्रूमेंटल कॉम्पीटीशनमध्ये बेस्ट गिटारिस्ट.
नुकतीच “मल्हार कॉम्युनेकशन जळगाव अंगीकृत “हुबी डूबी डू” कडून भूषण चव्हाणची मुलाखत घेणेत आली त्याबद्दल (क्लीपव्दारे) आपण जाणून घेऊ या!
जळगाव येथील श्री.रामदास बंडू बडगुजर परीवारीचा संगीतमय प्रवास,संगीत(बासरी,तबला,हॉर्मोनियम,गिटार,गीतगायन इ.) शिक्षणाचे कार्य तथा ज्ञानार्जन,बडगुजर समाजाच्या नावलौकिकात भर घालत आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती,अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर.इन,बडगुजर प्रॉऊड फॉऊडेन्शन टीम तर्फे संपूर्ण परीवाराचे अभिनंदन व पुढील संगीतमय वाटचालीस शुभेच्छा
🌹🌹




💐💐 congratulations