क्षत्रिय बडगुजर समाजाचे महाराष्ट्र राज्यातील सर्व, अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी यांना सप्रेम नमस्कार व नम्र विनंती,नम्र विनंती,नम्र विनंती🙏🙏🙏
आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होते की आपल्याच समाजाचा एक घटक चि.रोहित सुनील बडगुजर रा.शिरपूर(धुळे) हा विद्यार्थी कॉलेज ऑफ फार्मसी,बोराडी ता.शिरपूर,जि. धुळे येथे B.pharmacy (Final year)ला असून त्याचा मागील 3-4 दिवसांपूर्वी मोटारसायकल ने घरी जात असताना शिरपूर-बोराडी रस्त्यावर जबरदस्त अपघात झाला. त्यास त्यात उजव्या पायाला गंभीर दुखापत झालेली असून त्यास सिद्धेश्वर हॉस्पिटल,धुळे येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले,तेथील डॉक्टरांनी त्यास तपासले असता त्याच्या पायाला रक्तपुरवठा करणारी नस सापडत नसल्याने मोठी surgery करण्यात येणार व त्याच्या पायाच्या 3,4शस्त्रक्रिया करणार असल्याचे समजले आहे व त्यासाठी लागणार एकून खर्च 8 लाखापर्यंत असेल असे डॉक्टरांनी कळविले.
तरीदेखील एवढे करूनही त्या मुलाला कायमचे अपंगत्व येऊ शकते.
त्या मुलाची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून तो दिवसा कॉलेज करून सायंकाळी कामाला जायचा व त्याच्यावर तो त्याची दिनचर्या भागवत होता परंतु त्याच्यावर खूपच भयानक वेळ आज आलेली आहे,त्यामुळे त्या मुलासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला आहे व त्यात आपण देखील असाल यात शंका नाही परंतु ही मदत तात्पुरत्या स्वरूपात आहे🙏
माझ्या माहितीप्रमाणे पाचोरा(लोहारी)जि. जळगाव येथील समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशनाचा कार्यक्रम आटोपला असेलच.
तर आपण आता ह्या विषयात लक्ष घातले तरी चालेल कारण आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो व नुसतं विचारमंचावर जाऊन आपले विचार मांडून काही होत नसत त्यासाठी जमिनीवर उतरून समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करावे लागते.
आपण खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्यासाठी पदावर कार्यरत असाल तरच आपण ह्या विद्यार्थ्यांला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा माझ्यासकट सर्वसामान्य बडगुजर समाजबांधव करत आहेत.🙏🙏🙏
टीप- चि.रोहित पवार हा माझा नातेवाईक नसून एक समाजातील तरुण आहे,त्यासाठी समाजात पदावर बसलेल्या वरिष्ठांकडून काहीतरी मदत ह्या मुलाला व्हावी एवढीच अपेक्षा
रोहित च्या नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी खालील नंबर ला संपर्क करावा(गोपाल बडगुजर)
(9850785034)
आपलाच विश्वासू
श्री. परेश रविंद्र बडगुजर,मु.पो.बोराडी ता. शिरपूर, जि. धुळे
(सामाजिक कार्यकर्ता, INDIAN CRIME SAMACHAR -महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक)


Leave a Reply