COEP Tech, पुणे ZEST क्रीडा महोत्सव अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन – चि. यश शांताराम बडगुजर, पुणे

COEP Tech मधे आयोजित विविध महोत्सवांपैकी ZEST एक क्रीडा महोत्सव!! देशातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या या फेस्ट ची तयारी अत्यंत उत्सवात सुरू झालीय. त्यातील मॅरेथॉन इव्हेंटस चे आयोजन ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

मॅरेथॉन –
जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे ही मॅरेथॉन पूर्णपणे विद्यार्थी नियोजित आहे. COEP Tech युनिव्हर्सिटीच्या मैदानातून सुरुवात होणारी ही मॅरेथॉन पहाटे ५ वाजता सुरू होईल.
प्रामुख्याने मॅरेथॉन मधे ४ प्रकार असून त्यात तीन किलोमीटर, पाच किलोमीटर, पाच किलोमीटर (कॉर्पोरेट) आणि दहा किलोमीटर यांचा समावेश आहे. नोंदणी शुल्क अनुक्रमे ३ किमी – ₹४७५, ५ किमी/ ५ किमी(कॉर्पोरेट) – ₹६२४, १० किमी – ₹९२४ आहे. तसेच विजेत्यांना ₹१००००० पर्यंतची रोख बक्षीसे जिंकण्याची संधी आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूस COEP टी-शर्ट, फिनीशर्स मेडल, ई-प्रमाणपत्र, पौष्टिक अल्पोपहार तसेच COEP ZEST ची आठवण म्हणून एक वेलकम किट भेट देण्यात येणार आहे.


गेल्या वर्षी कोविडकाळात देखील ZEST टीमने उत्साही धावपटूंची निराशा न होऊ देता आभासी पद्धतीने (Strava App) मॅरेथॉन घडवून आणली आणि यशही मिळवले. मॅरेथॉनची नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने https://www.townscript.com/e/coep-zest23-marathon-340002 येथे सुरू झाली आहे. संपूर्ण शर्यत आणि शर्यतीच्या मार्गावरील वैद्यकीय सेवेचे नियोजन योग्यरीतीने सुरू आहे.

यश शांताराम बडगुजर,
सेक्रेटरी
ZEST’23
COEP TECH
Contact: 9284334199

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*