जळगावचे सुप्रसिध्द बासरीवादक श्री रामदास बंडू बडगुजर,यांचा संगीतमय जीवनपटः- श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

जळगाव: येथील श्री. रामदास बंडू बडगुजर, मूळगाव यावल ह.मु.जळगाव हे बडगुजर समाजातील परीचीत बासरी वादक आहेत, आज आपण त्यांच्या संगीतमय जीवनपटाबद्दल जाणून घेऊ या!
श्री.रामदासजी बडगुजर यांना अवघ्या ९ व्या वर्षापासून बासरी वाजवित असून, ८१ व्या वर्षीही जोपासलेला आहे. “बासरी” वाजविणेची प्रेरणा त्यांना त्यांचे थोरले बंधू कै.पांडुरंग बंडू बडगुजर यांच्याकडून मिळाली, पुढे ती प्राथमिक,माध्यमिक शाळेत व महाविद्यालयात चालू राहिली, व त्यावेळेस वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बासरी वाजवायचेत, तसेंच वर्गमित्र व आवड असणाऱ्यांना शिकवित असत. वयाच्या ८१ व्या वर्षी ते त्यांचे जेष्ट सुपुत्र प्रा.संजय बडगुजर यांचा “स्वरसाधना क्लासेस “आदर्शनगर, जळगावमधे क्लास घेत आहेत. त्यांनी त्यांचा बासरी वादन कार्यक्रम एम.जे. महाविद्यालय जळगांव येथे ही केल्याचे आवर्जून सांगितले, तसेंच ते “जळगाव आकाशवाणी” केंद्रा मध्ये काही दिवस रुजू झाले होते,परिस्थिती हलाखीची असलेने आणि त्यांना भू- विकास बँक भुसावळ येथे शासकीय नोकरी मिळालेने, त्यांनी आकाशवाणी केंद्राचे काम सोडले, कारणे बासरी वादनात करिअर घडवू शकले नसलेची खंत व्यक्त केली. नव्याने मिळालेल्या भू विकास बँक,भुसावळ येथे शाखा अधिकारी म्हणून रुजू झाले व ३८ वर्ष अविरत सेवा देत फेब्रुवारी २००२ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचे जीवनप्रवासात प्रत्येक वेळेस त्यांना त्यांच्या सहचारिणी सौ.आशालता (अक्का)रामदास बडगुजर यांची मोलाची साथ दिली.
नव-वर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांची मल्हार कॉम्युनेशन जळगाव, “Hobby Dooby Do” कडून मुलाखत घेण्यात आली.ती खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपण ऐकू व बघू शकता.यापूर्वी आपण त्यांचे जेष्ट सुपुत्र प्रा.संजय रामदास बडगुजर,संचालक,”स्वरसाधना”जळगाव व व्दितीय कन्या सौ.शुभांगी पराग बडगुजर, जळगाव यांचेबद्दलची माहिती आपण वेब पोर्टलव्दारे व “हुबी डूबी डू” तर्फे घेणेत आलेल्या मुलाखतीच्या माधम्यातुन बघितली आहेच.!
अ.भा.बडगुजर समाज महा समिती,वेब पोर्टल टीम,बडगुजर प्रॉऊड फॉऊंडेंशन,समस्त बडगुजर समाजातर्फे अभिनंदन व पुढील संगीतमय कार्यक्रमास लाखलाख शुभेच्छा!

🎤🎧🎼🎸🎹🎼🎧🎤

A Musical Series of BADGUJAR FAMILY @SWARSADHANA.. by Hobby Dooby Do, Jalgaon
🎵🎧🎼

💫Grateful to Team Hobby Dooby Do, Jalgaon 🌹🙏

आपल्या साठी विविध प्रकारची बासरी द्वारे म्हटलेली गाणी आम्ही युट्युब लिंक द्वारे सादर करत आहोत, सर्वांनी नक्की पाहून आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा, व्हिडिओस लाईक व सबस्क्राईब करावे

गाणी ऐकण्यासाठी व बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇🏻

1 Comment

  1. Very nice hobby Ramdas sheth has resided and offering to the next generations congratulations god will in presence with you all the time in your whole life

Leave a Reply

Your email address will not be published.


*