सर्व समाज बांधवांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
नवे वर्ष
नव्या वर्षाची नवी पहाट
घेऊन आली उर्जेची लाट
स्वप्नांच्या दुनियेतूनी निघाली
उषःकालाची नवीन वाट… १
नवे वर्ष नव्या कल्पना
नकोत त्या जुन्या वल्गना
सरत्या वर्षाच्या वेदना
विसरून नवे गीत गाना…२
नवे वर्ष नवा अंकुर
बीजातच माजले होते काहूर
आता पालवी लेऊन नवी
आम्हां फुले उद्याची दावी …३
नवे वर्ष नवीन आशा
जीवनाच्या तऱ्हा कशा
तरीही आहे अजून अशा
जीवन एक जगण्याची नशा…४
नव्या वर्षाची नवी गणिते
जगण्याची ती नवीन सूत्रे
नव्या कल्पना नवीन रीती
जाणून घेऊ नवीन नीती …५
जगणे हे तर आनंदगाणे
नको दुःख आणि खंतावणे
नव्या जगाची नवीन गाणी
गात चालली माणसे शहाणी…६
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265




Leave a Reply