पुस्तक प्रकाशन सोहळा :-
माणगांव – रायगड : इंग्रजी माध्यमातुन डिप्लोमा व डिग्री शिक्षण इंजिनिअरिंगचे घेतांना विद्यार्थ्यांना अवघड वाटते. म्हणुन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) तंत्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. परिषदेने १२ भारतीय भाषांमध्ये AICTE तांत्रिक पुस्तक लेखन आणि भाषांतर सादर केले आहे. या उपक्रमाचा उद्देश शिकण्याचे परिणाम, नवकल्पना आणि संशोधन क्षमता वाढवणे हा आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ)लोणेरे – रायगड येथील प्रा. डॉ.रविंद्रनाथ काशिनाथ जाधव यांनी डिप्लोमाचे Mathematics II हे पुस्तक मराठीत भाषांतर केले . हे पुस्तक AICTE e-KUMBH पोर्टलवर विनामुल्य उपलब्ध आहे . सदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई विद्यापीठ येथे १४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आशिष शेलार व मा. राज्यमंत्री , शिक्षण,भारत सरकार डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आता ते डिग्रीचे Mathematics III पुस्तकाचे मराठीत भाषांतर करीत आहेत.
पत्ता:
प्रा. डॉ . रविंद्रनाथ काशिनाथ जाधव
इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ)लोणेरे – रायगड
मोबाईल : ८२७५३५८७९४


Congratulations for your achievements and success in the publication of the book on the maths. I hope the book on the maths will be very useful and helpful to students,. The book will be useful, interesting to students, and help them to develop interset to understand the subject easily.
I hope you will publish more books in the future,and will share your knowledge among the students.
Thanks